"...तर तुमचं कर्तृत्व काय", संजय राऊत यांचा पडळकरांवर हल्लाबोल!

...तर तुमचं कर्तृत्व काय, संजय राऊत यांचा पडळकरांवर हल्लाबोल!

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्य चांगलंच चिघळलं होतं. अखेर प्रशासनाने पगारवाढ करण्याची घोषणा काल केली. आणि याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत गोपीचंद पडळकर यांच्यावर संतापले आहेत. महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल कामगारांसमोर, एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जहरी टीका केलीये. कामगारांचे नेते संप चिघळवत असतील तर ते कामगारांसाठी चांगलं नव्हे, असा हल्लाबोल देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?

राजकीय नेते संप चिघळवत आहेत

राज्य सरकारने एसटी कामगारांच्या वेतनात वाढ केली आहे. तरही कामगारांचे नेते मी कामगार म्हणत नाही. कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ काही राजकीय पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील. तर ते हजारो कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान करत आहेत. त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? करू नका. राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत. कारण हा जो महाराष्ट्र आहे.मुंबई जी आहे ही कामगार आणि शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळली आहे. कष्टकऱ्यांचे नुकसान व्हावे,असे आमचे सरकार कधीही करणार नाही.

कुठं थांबायचं हे त्यांना समजत असेल तर त्यांचं स्वागत

पुढे बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसतांना सुद्धा पॅकेज देण्यात आलं आहे. कामगार समजूतदार आहेत.महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल त्या कामगारांसमोर, एकेरी उल्लेख करता तुमचं कतृ्त्व काय आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी गोपीचंद पडळकर यांना चांगलच खडसावले आहे. कामगारांचे नेते संप चिघळवत असतील तर ते कामगारांसाठी चांगलं नव्हे, असंही संजय राऊत म्हणाले.संप सुरु करणारे दोन्ही नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आंदोलन थांबवायचा निर्णय घेत असतील तर कुठं थांबायचं हे त्यांना समजत असेल तर त्यांचं स्वागत करतो, असही संजय राऊत म्हणाले.

मूळ वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (२४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाची संप मागे प्रतिक्षा सरकार करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आज (२५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता निर्माण घेणार असल्याची माहिती खोतांनी दिली आहे. परंतु सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर, नाशिक आणि पुणे येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


Next Story
Share it
Top
To Top