'या' कारणासाठी शिवेंद्रराजे घेतली शरद पवारांची भेट

या कारणासाठी शिवेंद्रराजे घेतली शरद पवारांची भेट

मुंबई | महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक चांगल्याच चर्चेत राहिल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या अवघ्या एका मताने पराभव झाल्यामुळे साताऱ्यात कार्यकत्यांमध्ये गोंधळ झाला होता. तसेच बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचा प्रक्रिया सुरू असून सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पवार-भोसले या दोघांमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्षपदावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जिल्हा बँकेचा कारभार सर्वांना एकत्र घेऊन करभार करू, असे भोसलेंनी पवारांना भेटीदरम्यान बोलणे झाल्याची माहिती मिळाली असून भोसलेंना सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद पद मिळावे, अशी इच्छा देखील भोसलेंनी पवारांना बोलून दाखवल्याची माहिती मिळाली आहे. भोसलेंकडे संचालक पदासाठी हवे असलेले संख्या देखील आहे. तसेच भोसलेंना पुन्हा एकदा बँकेच्या चेअरमन पदी संधी देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top