चोरी झालेले मोबाईल शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम

चोरी झालेले मोबाईल शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम

मुंबई | कोरोना महामारीच्या काळात मोबाईल हा प्रत्येक मनुश्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन झाली आहे. उदाहरण बँकेचे व्यवहार, कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन स्कूल इत्यादीमुळे मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळेच मोबाईल चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे.

तक्रारदाराचा मोबाईल गहाळ झाल्यास मिसिंग प्रमाणपत्र देण्यात येते, परंतु पोलीस ठाण्याचे कामकाजाची व्याप्ती व ताणतणाव पाहता तसेच बंदोबस्त आणि इतर कामकाज पाहता गहाळ मोबाईल परत मिळण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. मोबाईल गहाळ झाल्यास मोबाईल धारकास अत्यंत वाईट वाटते. गरीब व मध्यमवर्गीयांसाठी हे आर्थिक नुकसानदायी असते. परंतु गहाळ मोबाईल लोकांना परत मिळण्यास मदत झाली तर सर्वसाधारण जनतेच्या मनात पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल व जनमानसात पोलिसांबद्दल आदर आणि विश्वास निर्माण होईल.

त्याअनुषंगाने वरळीच्या मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याकडून मध्य प्रादेशिक विभागा अंतर्गत गहाळ किंवा चोरी झालेल्या मोबाईलची माहिती गोळा केली. दि. १५/२/२०२२ ते १४/४/२०२२ पर्यंत गहाळ मोबाईलबाबत उपलब्ध तांत्रिक माहितीचे कौशल्यपुर्वक विश्लेषण करून कमी कालावधीत अथक परिश्रम करून सध्या गहाळ मोबाईल वापरत असणाऱ्या व्यक्तीस अथवा त्यांचे मित्र, नातेवाईक, सहकारी यांना संपर्क साधुन सदर गहाळ/चोरी झाालेले एकूण अंदाजे ₹१५,५०,००० किंमतीचे १०५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. हे कार्य मोबाईल मिसिंग पथकाने पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी त्यांचे दैनंदिन कामकाज सांभाळून केवळ दीड महिन्यातच कौषल्यपुर्वक पूर्ण केले आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात उंचाविण्यास मोलाचे योगदान मध्य विभाग सायबर पोलीस ठाणे मार्फत झाले आहे. गहाळ झाालेले मोबाईल हस्तगत केवळ बृहन्मुंबईतून नाही तर देशातील विविध राज्यातून म्हणजेचं उत्तरप्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटक, गुजरात, हार्डा राज्य मध्यप्रदेष ,राजस्थान, या परराज्यातून तसेच पुणे, कोल्हापूर उरण, बेंगलोर, बीड, गोंदीया या जिल्हयांमधून देखील गहाळ/चोरी झाालेले मोबाईल हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले आहे. गहाळ/चोरी झाालेले एकुण अंदाजे ₹१५,५०,००० किंमतीचे १०५ हस्तगत मोबाईलच्या मुळ मोबाईल धारकांचा शोध व संपर्क साधून देण्याची तजवीज करण्यात येत आहे.

ही यशस्वी कामगारी पोलीस आयुक्त संजय पांडे, सह पोलीस आयुक्त, गुन्हे मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे विरेश प्रभु, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य सायबर पोलीस ठाणे, वरळी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर महादेव शिंदे यांच्या देखरेखेखाली पोलीस उप निरीक्षक सुयोग अमृतकर, पोलीस नाईक नंदकिषोर महाजन, पोलीस शिपाई जय गदगे महिला पोलीस शिपाई शीतल सावंत, महिला पोलीस नाईक सुप्रिया राउत यांनी पार पाडली.


Next Story
Share it
Top
To Top