दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न जे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दाखवले, ते जर आपण पूर्ण करु! - उद्धव ठाकरे

दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न जे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दाखवले, ते जर आपण पूर्ण करु! - उद्धव ठाकरे

मुंबई | दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न जे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दाखवले, ते जर आपण पूर्ण करु शकत असून तर आणि तरच या सगळ्याला अर्थ आहे, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर निवडणुका शिवसेना लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. देशात फेब्रुवारी महिन्यात पाच राज्याच्या निवडणूक आहेत. तसेच शिवसेना गोवामध्ये निवडणूक लढवणार आहे. तर गोव्यासाठी शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्ताने उद्धव ठाकरेंनी काल (२३ जानेवारी) शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "दिल्लीत शिवसेना प्रमुखांचा पुतळा, तो तर आपल्याला उभा करायचा आहेच. दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न जे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दाखवले आहे. ते स्वप्न आपण पूर्ण करु शकत असून तर आणि तरच या सगळ्याला अर्थ आहे. आजचा एक दिवस आपल्या शिवसैनिकांच्या आयुष्यातला सण असतो. प्रचंड संख्येने आपण सगळे मातोश्रीवर यायचात."

"जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत. त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार आहे. जसे काळजीवाहू सरकार असते तसे काळजीवाहू हे विरोधक आहेत. स्वत:च स्वत:च्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही. हे काळजी वाहू विरोधक कोणे एकेकाळी आपले मित्र होते. हे नाही म्हटले तरी आपले दुख आहे. आपण त्यांना पोसले. होय, पोसलेच, आणि मी मागे एकदा बोलो होतो. गोरेगावच्या सभेत की २५ वर्ष आपली युतीमध्ये सडली. तीच भूमिका आणि तेच मत माझे आजही कायम आहे. आणि मी त्या मतावर ठाम आहे."

२५ वर्ष ह्यांना पोसल्यानंतर लक्ष्यात आले

यापूर्वी शिवसेना प्रमुख म्हणायचे की, राजकारण म्हणजे गजकर्ण आहे, जेवढे खाजवावे तेवढी ते अधिक खाज येते. तसे हे सगळे गर्जकर्णी, म्हणजे राजकारणातले, नाही तर पुन्हा एकदा मथळा यायचा की, मी त्यांना गजकर्णी म्हटले. तसे नाही, ज्यांना राजकारणाचे गजकर्ण झाले त्यांना मी म्हटले ते राजकराण म्हणून ते काही खाजवित आहेत. आपण यांच्यापासून का दुर्वलो की त्यावेळेला आपल्याला शिवसेना प्रमुखांनी एक दिशा दाखविली. हिंदुत्वा हिंदुत्व कशासाठी, हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता आपल्याला सत्ता पाहिजे होती. हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व आणि हा एक प्रश्न आहे. आजच यांचे जे पोकळ हिंदुत्व आहे. ते सत्तेसाठी आगीकारलेले ढोग आहे. होय, तसेच आहे. जसे वाघाचे कातडे पांघरलेल्या काय गाढव म्हणा, शेळी असते तसे हे आता आपल्या लक्ष्यात आले. २५ वर्ष ह्यांना पोसल्यानंतर लक्ष्यात आले."Next Story
Share it
Top
To Top