HW News Marathi
मनोरंजन

घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय?- सुरेखा पुणेकर यांचा सवाल

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली. शिरूर येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेने आयोजिलेल्या राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात दरेकर बोलत होते. लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर नाव न घेता, दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी केली होती. याला आता सुरेखा पुणेकर यांनी प्रत्त्युतर दिलं आहे. महिलेचा अपमान करणं तुम्हाला शोभलं का? , घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय? असा सवाल सुरेखा पुणेकर यांनी उपस्थित केलाय.

त्यांना महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला?

प्रविण दरेकरांना सुरेखा पुणेकर यांनी आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं. ”घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय?” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ‘मला दरेकरांबाबत खूप वाईट वाटतेय. त्यांना महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला? आज मी धुण्याभांड्याची कामं करून इथपर्यंत आले आहे. मी जर महाराष्ट्राची कला परदेशात नेऊ शकले, घराघरात मी लावणी कला चुकवली. अशा महिलेला दरेकरसाहेब नावं ठेवत असतील तर ते साफ चुकीचं आहे. महिलांना मान देऊ शकत नाही तर ठीक आहे पण अपमान तरी करू नका. प्रविण दरेकर यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्य़था याचा परीणाम वाईट होईल.’ सुरेखा पुणेकर यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दरेकरांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासह शांताबाई फेम संजय लोंढे, गायिका डॉ. देवयानी बेंद्रे यांच्यासह सोलापूरातील एका दिग्गज नेत्याचाही राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वारातीम विद्यापीठातर्फे २४ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान संगीत तथा नाट्यकला महोत्सवाचे आयोजन 

News Desk

असा महात्मा होणे नाही…

swarit

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार महेश एलकुंचवार यांना जाहीर

News Desk