HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या घरावर मोठा हल्ला, ही दुर्दैवी घटना; ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुंबई | एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण न झाल्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसस्थानी जावून चप्पल आणि दगडफेक झाल्याची मोठी घटना घडली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या घरावर हल्ला ही दुर्दैवी घटना असून शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यास तयार आहोत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पोलिसांचे आभार मानले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाले, ” मी पोलिसांचे आभार मानते. माझ्या घरावर मोठा हल्ला, ही दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे पहिल्यांदाच घडले. मी हात जोडून विनंती करत आहे. मी तुमच्यासोबत ह्या क्षणी बसून चर्चा करण्यास तयार आहे. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहेत. मला माझ्या कुटुंबीय सुरक्षित मला बघू द्या. मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय की, मी तुमच्यासोबत ह्या क्षणी बसून चर्चा करण्यास तयार आहे. परंतु, या गोंधळाच्या वातावरणात चर्चा होणार नाही. मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करते.  मला माझ्या आई-वडील आणि मुलीला भेटून मी दोन मिनिटात तुमच्यासबोत बोलते.”

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पोलिसांचे आभार मानले आहे. शरद पवारांच्या निवसस्थानी एसटी आंदोलनकर्त्यांनी घेराव केल्यानंतर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील सह मोठा फौजफाटा सिल्व्हर ओक त्यांच्या निवसस्थानी दाखल झाले. सध्या पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात घेतले असून शरद पवारांच्या निवसस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत २ जणांना कोरोनाची लागण, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वर

swarit

आपले आमदार जाऊ नये या भीतीने कदाचित देवेंद्र फडणवीस बोलत असावे – रोहित पवार  

News Desk

…म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीत इन्कमिंगला सुरूवात – नवाब मलिक

News Desk