"...हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही," उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

...हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

मुंबई | "हिंदुमध्ये शिवसेना प्रमुखांनी जे रक्त पेरले आहे, हा हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. कुणाची बिशात आहे, बघतो ना हिंदुत्वावर घाला घालण्याची," असा इशारामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१४ मे) वांद्रेच्या एमएमआरडीच्या मैदाना शिवसनेची भव्य सभा घेतली आहे. या सभेतून उद्धव ठाकरेंनी, भाजप, केंद्राने राज्य सरकारला न दिलेल्या जीएसटी दिला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विधासनभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी मुद्यांवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलोय. अनेक विषयांवर बोलायचे आहे.महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र म्हणजे काय हे ओळखता आले नाही, त्यांच्यासाठी मध्ये मध्ये बोलावे लागते. हल्ली काही खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता. परंतु, देशाची दिशा भरकवटत आहेत. हल्ली काही खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता. परंतु, देशाची दिशा भरकवटत आहेत.आमचे हिंदुत्व हे गदाधारी आहे, इतरांचे घटाधारी आहे, आता बसा बडवत घंटा, काय मिळाले, घंटा.मी मध्य तरी म्हणालो होतो, आमचे हिंदुत्व गदाधारी आहे. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे हिंदुत्व हे गधाधारी होते. पण मी त्यांना सांगतो की, अडीच वर्षापूर्वीच आम्ही भाजपला म्हणजे तुम्हाला सोडले आहे. आम्ही गध्याला सोडू दिले. त्याचा काही उपयोग नाही. जी गाढवे आमच्यासोबत घोड्याच्या वेशपागरून आमच्यासोबत होती. त्या गाढवाने आम्ही लाथ मारायच्या आधीच आम्ही त्यांना लाथ मारली. आता बसा बोंबलत. हिंदुमध्ये शिवसेना प्रमुखांनी जे रक्त पेरले आहे, हा हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. कुणाची बिशात आहे बघतो ना हिंदुत्वावर घाला घाणारची."

मुंबईचा लचका तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्यांचे तुकडे करू

"राज्यात १ मे साजरा करत असताना, भाजपची एक सभा होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस चुकून त्यांच्या पोटात जे होते, ते त्यांच्या ओठात आले. मालकांची इच्छा त्यांनी बोलून गेले की, मुंबई स्वातंत्र करणार आहे. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या. तर येथल्या मर्द मावळ्यामध्ये जिवंतपणे आहे.मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्यांचे तुकडे करू," अशी धमकी वजा इशारा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो.. तुमच्याप्रमाणे मलाही मोकळे वाटते


Next Story
Share it
Top
To Top