राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब! - अजित पवार

राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब! - अजित पवार

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कुणाकुणाची निवड केली. यासंदर्भात अजित पवार पत्रकारांना माहिती देत असताना त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला आहे. अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानंतर काही वेळेसाठी पत्रकार देखील गोंधळून गेले होते. परंतु, आता अजित पवारांनी आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री केलेल्या उल्लेखावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार म्हणाले, "नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारने सुरु केलेली आहे. पण, जर राज्यात कोरोनाबाबत ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली, तर या बद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब घेतील." पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली. यासंदर्भात पत्रकारांना माहिती ते म्हणाले.

"बँकेच्या वेगवेगळ्या पदांवर कोणला कोणती जबाबदारी देण्यात आली, संदर्भात अजित पवार माहिती देताना म्हटले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यात ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली, तर या बद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब घेतील," असे अजित पवार म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते सध्या वर्क फॉर्म होम करत आहे. गेल्या २ महिन्यापासून मुख्यमंत्री प्रसार माध्यमांसमोर आले नाही. परंतु मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फेसिंगद्वारे राज्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत हजेरी लावतात. यावरून भाजप मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत.Next Story
Share it
Top
To Top