कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला

कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला

मुंबई | राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत सापडला आहे. मुंबई जवळच्या कल्याण-डोंबिवलीत एका व्यक्तीला ओमिक्रॉनची रुग्ण झाले आहे. हा ओमिक्रॉनचा दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबई दाखल झाला. ओमिक्रॉन रुग्णांचे ३३ वर्षीय तरुण आहे.

देशातील कर्नाटकमध्ये दोन व्यक्तींना ओमिक्रॉनली लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यालायने दिली. यानंतर आज (४ डिसेंबर) गुजरामध्ये एका वृद्ध व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. आणि आता राज्यातील कल्याण-डोंबिवलीमधील एका तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली.

या तरुणाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी त्यांचे नमुने पाठवण्यात आले. आणि आज त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळाली. या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचे कोविड अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1467138334107471874?s=20


Next Story
Share it
Top
To Top