आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई। मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांची आजची (१४ मे) ही वांद्रे पूर्वेच्या एमएमआरडीएच्या मैदानात होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री हे राज्यात सध्या जे भोंग्यांच्या मुद्यावरून सुरू असलेल राज कारण, हनुमान चालिसा, हिंदुत्व, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यावर टीका केली होती. "आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येते-जात असते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही," अशी टीका राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या पत्राला सभेतून नेमके उत्तर देणार याकडे लक्ष लक्ष लागले आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे मुंबईसह राज्यातील इतर महापालिका डोळ्यासमोर ठेवून जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

सभेमुळे 'हे' मार्ग बंद असलेल

मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी सी लिंकवरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या वानांच्या वाहतुकीस भारत नगर जंक्शनवरून जाण्यात बंध आहे. तर संत ज्ञानेश्वर नगर येथून येणाऱ्या आणि कर्ल्यावरून भारत जंक्शनकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असेल. धारावी, वरळी सी, कुर्ला, आणि रज्जक जंक्शनवरून पश्चिम द्रुतगती महामार्ग, एमटीएनएल जंक्शनपासून भारत नगर जंक्शनकडे जाण्यासाठी बंद आहे


Next Story
Share it
Top
To Top