"महाराष्ट्रमध्ये गुजरात-उत्तर प्रदेशसारखी कोरोना स्थिती नव्हती!" - नवाब मलिक

महाराष्ट्रमध्ये गुजरात-उत्तर प्रदेशसारखी कोरोना स्थिती नव्हती! - नवाब मलिक

मुंबई | महाराष्ट्रमध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेशसारखी कोरोना स्थिती नव्हती. या दोन्ही राज्यात कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजन आणि बेड मिळत नव्हते. यामुळे गुजरात आणि उत्तर प्रदेश या दोन्हीसारखी परिस्थिती महाराष्ट्रात झाली नाही, दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज (३० डिसेंबर) पत्रकार परिषेदतून केला आहे.

राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता. परंतु राज्य सरकारने योग्य त्या उपायोजना करून कोरोनाची परिस्थिती हाताळली. जेव्हा कोरोनाचे रुग्णांची संख्या राज्यात वाढली होती. तेव्हा राज्य सरकारने योग्य पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा केला. त्याचबरोबर औषधांचा काळाबाजारही रोखला असून महात्मा ज्योतिबा फुळे कृषी संवर्धन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली.

उत्तर प्रदेश गंगेत मृतदेह सापडले

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे लपवले आहे. तर उत्तर प्रदेशात गंगेत मृतदेह सापडले तर काही मृतदेह गंगेच्या किनाऱ्यावर दफन करण्यात आले. पंरतु, महाराष्ट्रात या दोन्ही राज्याच्या तुलनेत परिस्थिती खूप चांगली होती. राज्यातील परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळल्याचे म्हणाले.


Next Story
Share it
Top
To Top