"तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ", भास्कर जाधवांचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर हल्लाबोल!

तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ, भास्कर जाधवांचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर हल्लाबोल!

रत्नागिरी। राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आले तेव्हापासून सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडीत असेच चित्र वारंवार पहायला मिळतय. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसतात. मात्र आता ही बातमी थोडी वेगळी आहेत कारण महाविकास आघाडीतीलच दोन दिग्गज नेते आमने सामने आल्याचं चित्रं उभं राहिलय, आपल्याला सगळ्यांनाच दिसतं की महाविकास आघाडीत सगळं काही सुरळीत चालू आहे. परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण शिवसेनेचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे दोघेही आघाडीचे नेते आता समोरासमोर आले आहेत. आणि या दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी पहायला मिळते. कोकणातील विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. त्याला सुनील तटकरे यांनी विरोध केला. त्यामुळे जाधव संतापले आणि त्यांनी तटकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला. कुणबी समाजाला जागा द्या म्हटलं तर तुम्हाला मिरची का लागली? असा सवाल करतानाच तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ, असं म्हणत शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंना आता चांगलंच हेरल आहे.

नाव राष्ट्रवादी पण काम मात्र कुटुंबवादी

भास्कर जाधव आणि तटकरे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला पहायला मिळतोय. शिवसेनेचे भास्कर जाधव यांचे म्हणणे आहे की, विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी या भास्कर जाधवांच्या मागणीमुळे सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद आता चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. कुणबी समाजाला एक जागा सोडा म्हटल्या नंतर सुनील तटकरेना मिरच्या का झोंबल्या? तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ? केवळ नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी, असा हल्लाबोल करत होता महाविकासआघाडी तच कुरबुरी सुरू झाल्या आहेत. तटकरे यांच्यावर खोट्या कंपन्यां स्थापन करून लोकांच्या हजारो एकर जमीनी हडप केल्याचे आरोप आहे. 10 ते 15 हजार कोटींची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचेही आरोप तटकरे यांच्यावर आहे. त्यामुळे अशा माणसाला मार्गदर्शन करण्याची माझी कुवत नाही, असा सनसनाटी आरोपच आता जाधव यांनी केला आहे. मार्गदर्शन करण्यासाठी समोरच्याकडे जाण्यासाठी जाणीव आणि नीतिमत्ता लागते आणि सुनिल तटकरे यांच्याकडे यातलं काहीच नाही,अशी टिकाच आता मित्र पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर करायला सुरुवात केली.

मला पाडण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी काड्या केल्या

पुढे बोलताना शिवसेनेचे भास्कर जाधव म्हणाले की राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना फक्त घ्यायचं माहिती आहे. द्यायचं माहीत नाही. तटकरे यांना खासदार करण्यात माझं मोठ योगदान आहे. माझ्या कोणत्याही विजयात सुनील तटकरे यांचं योगदान नाही. उलट मला पाडण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी काड्या केल्या. मदत करणाऱ्यांचंच त्यांनी कायम वाटोळं केलं, असा घणाघात करत गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. तटकरे स्वतःला राष्ट्रवादीचा फाऊंडर मेंबर म्हणवतात, पण ते सत्य नाही. सुनील तटकरे हे मूळचे काँग्रेसचे आहेत, अशी टीका आता महा विकास आघाडी सुरू झाली आहे.


Next Story
Share it
Top
To Top