HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार! – नाना पटोले

मुंबई | अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्यासारखे हे अभियान नसून हे अत्यंत पारदर्शक व विश्वासार्ह सदस्य नोंदणी अभियान आहे. हे अभियान यशस्वी करण्यात महाराष्ट्रातून मोठे योगदान देऊन देशात सर्वात जास्त सदस्य नोंदणी महाराष्ट्रातून करू, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

टिळक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख के. राजू, खा. ज्योतीमणी, प्रविण चक्रवर्ती, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सहप्रभारी सोनल पटेल, बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख, मोहन जोशी, संजय राठोड, चारुलता टोकस, उल्हास पवार, मुनाफ हकीम, भा. ई. नगराळे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान अहमद, प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, सरचिटणीस व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया देशात घातला त्याचे पुढले पाऊल म्हणजे हे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान आहे. मोबाईच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी होणार असून अत्यंत जलदगतीने होणार असून अत्यंत विश्वासार्ह आहे.

डिजीटल अभियानाचे प्रमुख राजू यांनी या अभियानाची माहिती देताना सांगितले की, डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान अत्यंत महत्वाचे असून यातून पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक बुथवर दोन स्वयंसेवक, एक महिला व एक पुरुष यांच्या माध्यमातून घराघरात जाऊन ऍपच्या माध्यमातून ही सदस्यता नोंदणी केली जाणार आहे. सदस्य नोंदणी होताच त्या सदस्याला एसएमएस येईल आणि या सदस्यांना आयडी कार्डही देण्यात येणार आहे.

डिजीटल सदस्यता अभियान कसे चालवले जाईल याची सविस्तर माहिती खा. ज्योतीमणी यांनी दिली. एक सदस्य नोंदणी करण्यास एक मिनीटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. १०० टक्के विश्वासाहार्य सदस्य नोंदणी असून निवडणूक आयोगाच्या डेटासोबत ही माहिती पडताळून पाहिली जाईल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या तोंडातील अल्सर काढला, तब्येत एकदम ठणठणीत – नवाब मलिक

News Desk

हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत, फडणवीसांचा खरमरीत टोला

News Desk

भाजप सरकारला चले जाव सांगण्याची हीच योग्य वेळः खा. अशोक चव्हाण

News Desk