HW News Marathi
देश / विदेश

‘जबरदस्तीने तुम्हांला घरात बसवू ‘ तुकाराम मुंढेंचा नागपुरकरांना इशारा !

नागपूर | कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेतां मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार शहरं लॉकडाऊन केली आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी अजूनही रस्त्यांवर गर्दी आहे.नागपुरची गारदी अद्याप हटत नाहीये त्यामुळे नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे अक्शन मोडमध्ये आले आहेत. “विनंती करुनही घराबाहेर पडत असाल तर आम्ही जबरदस्तीने तुम्हाला घरी बसवू, ती वेळ आणू नका, आता विनंती करतोय, जबरदस्ती करायला लावू नका, आताच मदत करा, जबरदस्तीची वेळ आणू नका” असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावून सांगितलं.

शहर लाॅकडाऊन केलीयेत म्हणजे लोकांनी घराबाहेर पडावे असं नाहीये, फक्त दुकान बंद करायची नाहीयेत तर लोकांनी घरात थांबायचं आहे,आणि लोक जर घरात थांबत नसतील तर आम्हांला जबरदस्ती करावी लागेल असा सज्जड दम आयुक्तांनी दिला आहे .लोकांना सांगूनही लोक ऐकत नाहीत अशी खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मान्सून दक्षिण अंदमानमध्ये दाखल

News Desk

किरिट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल | अतुल लोंढे

Gauri Tilekar

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय-बच्चन यांना EDकडून समन्स

Aprna