मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपचे कार्यक्रर्ते, नेते आणि मंत्री आक्रमक झाले आहेत. यात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मी मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले तर माझ्या विधानाचा विपर्यास केल्याच ते म्हणाले गडकरींनी ट्वीट म्हणाले, "माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी," अशी मागणी त्यांनी केली.
गडकरी म्हटले, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी." 'मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो', असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोलेंनी केले. यानंतर नाना पटोलेंनी त्यांच्या वक्तव्यावरून युटन घेत, ते ट्वीट करत म्हणाले, "मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही, तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो."
नेमके काय म्हणाले नाना पटोले
पंतप्रधानांविरोधात नाही तर मोदी नावाच गावगुंड ते वक्तव्य - नाना पटोले "त्या भागात निवडणुका चालू आहेत. आमच्या भागात मोदी नावाच गावगुंड आहे. त्याची तक्रार गावकरी माझ्याकडे करत होते. जो गावगुंड मोदी आहे त्यांच्याविरोधात माझे हे व्यक्तव्य आहे. या व्हिडिओमध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव कुठे घेतले नाही. आणि मी अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य करत नाही. तुम्ही व्हायरल व्हिडिओ पाहा मी प्रधानमंत्री आणि नरेंद्र पण शब्द वापरलेला नाही. मी मोदी असा शब्द वापरला. माणूस हा केव्हा घाबरतो, जेव्हा त्याचे घर काच्चे असते, तेव्हा तो घाबरतो. माझे घर काच्चे नाही. त्यामुळे मला कोणाला घाबरण्याची गरज नाही. गावातील लोक माझ्याकडे गावगुंडची तक्रार करत होते. आणि योगा योगाने त्यांचे नाव मोदीच आहे. माझा व्हायरल होणार व्हिडिओ हा कुठल्या सभेतला नसून मी गावकऱ्यांचे ऐकून त्यांना समजून सागत होतो," असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.
वादग्रस्त वक्तव्यानंतर नाना पटोलेचे स्पष्टीकरण
"मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो," असे म्हणत नाना पटोलेंनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले. पटोलेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, "माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो."