राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोधी तर दोन जागांसाठी होणार लढत

राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोधी तर दोन जागांसाठी होणार लढत

मुंबई। राज्यात ६ जागेसाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल (२७ नोव्हेंबर) उमेदरी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. यामुळे काल सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पहायला मिळाले. अखेर राज्यातील ६ पैकी ४ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. परंतु, विधानपरिषदेच्या फक्त दोन जागेवर निवडणूक होणार आहे. काल

दुपारी तीन वाजताच्या सुमारास कोल्हापूरमधील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचा बिनविरोध निवड झाली. राजकीय सलोखा राखावा म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे महाडिकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. परंतु नागपूर आणि अकोला-वाशीम-बुलडाणा येथे शिवसेनाविरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरमध्ये भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवड झाली. तर धुळ्यामध्ये भाजपचे अमरिश पटेल हे बिनविरोध झाली. त्याव्यतिरिक्त मुंबईमधील बिनविरोध झालेल्या दोन जागांवर भाजपचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे यांची देखील बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर तर अकोला-वाशीम-बुलढाणा मतदारसंघात भाजपकडून वसंत खंडलवाल आणि महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजेरिया निवडणूक लढवत आहेत. यापुर्वी बाजेरिया हे तीन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.


Next Story
Share it
Top
To Top