HW News Marathi
महाराष्ट्र

“…तुम्हाला तर घरातून काढले”, अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

मुंबई। “तुम्हाला काय उत्तर देऊ. तुम्हाला तर घरातून काढले, तुम्हाला मी काय उत्तर देऊ, ” अशी टीका एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. अकबरुद्दीन ओवेसी हे आज (१२ मे) औरंगाबादमध्ये त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यापुर्वी अकबरुद्दीन ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यामुळे अकबरुद्दीन यांच्यावर टीका होत असताना. राज ठाकरेंवर टीका करत दुसऱ्या वादाला तोंड फुटले आहे.

अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले, “मी येथे कोणालाही उत्तर द्याला आलेलो नाही. मी कोणालाही वाईट बोलायला आलेलो नाही. ते करायची मला गरजच नाही. मी तुम्हाला उत्तर देईल, एवढी पण तुमची लायकी नाही. माझा एक तरी खासदार आहे. तुम्ही तर बेघर आहात. तुम्हाला काय उत्तर देऊ, तुम्हाला तर घरातून काढले होते. मी तुम्हाला काय उत्तर देऊ.”

देशात आज द्वेष पसरवला जात आहे. परंतु, अकबरुद्दीन ओवेसी द्वेषाला द्वेषाने उत्तर देणार नाही तर प्रेमाने उत्तर देईन. तुम्ही या सर्व परिस्थितीला घाबरले असाल तर घाबरू नका. जर कोणाला वाटत असेल तर आम्ही घाबरणार नाही. तुम्हाला कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही. तुम्ही घाबरू नका, निर्धास्त रहा. कायदा हातात घेण्याची गरज नाही. द्वेष करणाऱ्यांनी ४० टक्के मते मिळवली. आणि ते आता विसरले की ६० टक्के मत आमच्यासोबत आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी संपाला भोकर तालुक्यात हिंसक वळण

News Desk

५० टक्क्याची आरक्षणाची मर्यादाही काढावी लागेल, संभाजीराजेंचा केंद्र सरकारला सल्ला!

News Desk

मंत्रिमंडळाची आज बैठक, टप्प्याटप्प्याने अनलॉक होण्याची शक्यता?

News Desk