HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब बेनकाब हो गया है, केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव का आणताय? – आशिष शेलार

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा एकाद्या देश हिताच्या मुद्यावर तपास करीत आहेत. त्यावेळी त्याचे उत्तर कायदेशीर मार्गाने देण्याचे सोडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तपास यंत्रणांवर दबाव का आणत आहेत? त्यांची बदनामी का करीत? आहेत असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी नवाब बे नकाब हो गया है, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांनी मुंबई भाजपा कार्यालयात आज (२३ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन भाजाची भूमिका स्पष्ट केली. आज पत्रकार परिषद न घेण्याची वेळ आली असती तर बरे झाले असते पण वारंवार भाजपाचे नाव घेतले जात आहे त्यामुळे ही पत्रकार परिषद घेतल्याचे सांगत आमदार अँड आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका विषद केली.

केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि एनआयए गेल्या काही महिन्यांपासून अंडरवल्ड डाँन दाऊदच्या मालमत्तांच्या व्यवहाराबाब चौकशी करीत आहेत. अशावेळी उत्तरे देता येत नाहीत म्हणून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष भजपाच्या नावाने थयथयाट करीत आहेत. त्यांनी जे काही बोलायचे ते न्यायालयात जाऊन बोलण्यासाठी अथवा जनतेच्या दरबारात बोलण्याचे दरवाजे खुले असताना, कायदेशीर मार्गाचा वापर न करता तपास यंत्रणांवर दबाव का आणला जातोय? तपास यंत्रणांचे खच्चीकरण का केले जाते आहे.?,बदनामी का करण्यात येते आहे? हे चूकीचे असून तपास यंत्रणांना आपले काम करु द्या विशेषतः देश हिताच्या मुद्यावर राजकारण करण्याची गरज नाही,आम्ही ही करणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा जो तपास करीत आहेत त्यामध्ये सत्य समोर येईलच.

अंडरवल्ड डाँन दाऊदच्या मालमत्तां सरकारने ताब्यात घेऊन त्याबाबत पुढील कार्यवाही करणे अपेक्षीत असताना या मालमत्ता परस्पर विकल्या जात आहेत, त्यांचे हस्तांतर केले जात आहेत, यामध्ये मोठे व्यवहार होत असून यातून येणार पैसा कुठे वापरला जातोय?, आतंकवादासाठी तर हा पैसा वापरला जात नाही ना? याचा तपास तपास यंत्रणा गेले काही दिवस करीत असून यातील सत्य समोर येण्याची गरज आहे. दाऊदची बहिण हसीना पारकर, सरदार शहावाली खान, सलीम पटेल, इक्बाल कास्ककर ही नावे पुढे आली आहेत त्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये गेले काही दिवस समोर येते आहे. अशावेळी ज्या यंत्रणा तपास करीत आहेत त्यांच्यावर दबाव आणून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष या चौकशीमध्ये अडथडा आणण्याचे काम का कारीत आहे? असा सवालही आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. या सरकारच्या वागण्यातून नवाब बेनकाब हो गया है आणि आतकंवादी समर्थक ठाकरे सरकारचा चेहरा समोर आला आहे, पर्दाफाश झाला आहे, अशी टीपणीही आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या, विधानावर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, आतंकवादाला कुठलाही जात धर्म नसतो हे ज्येठ असलेल्या पवार साहेब यांना माहिती आहेच.

सुप्रिया सुळे यांच्या विधानांचा निषेध

 सुप्रियाताई सुळे या महाराष्ट्रातील मोठया नेत्या असून त्यांनी इडीचे अध्यक्ष आणि भाजपाचे अध्यक्ष याबाबत केलेल्या विधानांचा आम्ही निषेध करतो. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांकडून अशा विधानांची अपेक्षा नाही.. आम्ही या विधानाचे खंडण करतो, आम्हाला ही आत्मसन्मान आहे. त्यामुळे त्यांनी हे विधान मागे घ्यावे असे ही भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाज आक्रमक, १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा!

News Desk

शौमिका महाडिकांची गोकुळ दूध संघाच्या चिलिंग सेंटरच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर!

News Desk

भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग | शरद पवार

News Desk