तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंच्या खाद्याला खादा लावून संकटाला सामोरे जावू! - किशोरी पेडणेकर

तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंच्या खाद्याला खादा लावून संकटाला सामोरे जावू! - किशोरी पेडणेकर

मुंबई | शिवसेनेत ४५ ते ५० च्या वयोगटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नाही, असा रिपोर्ट हिंदुस्थान पोस्ट न्यूज पोर्टल यांनी दिला आहे. यानंतर राजकीय वर्तळात चर्चेला उधाण आले आहेत. "तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंच्या खाद्याला खादा लावून संकटाला आम्ही सामोरे जावू, मग आदित्य ठाकरे जाईल," यासंदर्भात मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापौरांनी आज (७ जानेवारी) मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या.

महापौर म्हणाल्या, "आमच्या मुंबई आणि महाराष्ट्राचे नागरिक हे हुशार आहेत. राज्यातील नागरिक हे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे आहेत. आणि आदित्य ठाकरे हे या दोघांच्या तालीममध्ये तयार झाले आहेत. म्हणजे या वयोगटातील लोकांना निवडणुकीत तिकट देणार नाही. हे निवडणुकीपूर्वी कोणी तरी षडयंत्र करत असल्याचा दावा त्यांनी केला. या षडयंत्रला आमचे शिवसैनिक बळी पडणार नाही." "मी महापौराच्या खुर्चीपर्यंत पोहचेन. त्यामुळे हे कुठे तरी हे आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व सुरू होय, याची धडकी भरली, यामुळे असे बेनामी ट्वीट किंवा सोशल मीडिया वापरून शिवसेनेचे ज्येष्ठ नागरिका किंवा शाखा प्रमुख त्यांना नाउमेद करणे आणि पक्षावरील प्रेम आणि त्यांची निष्ठा कमी करण्याचा प्रयत्न आहे. पण तसे होणार नाही. तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंच्या खाद्याला खादा लावून. येईल त्या संकटाला आम्ही सामोरे जावू मग आदित्य ठाकरे जाईल."

भयमीत करण्याचा प्रयत्न करू नका

युवा सेनेच्या नेत्यांना बढती देण्याचा प्रयत्न आहे का?, असा सवाल पत्रकारांनी विचारला आहे. यावर बोलताना महापौर म्हणाल्या,"नवीन हे येतच सर्व पक्षामध्ये असे होतच असते. त्यामुळे आदित्य ठाकरे हे वयाने लहान असले तरी त्यांच्या परिपक्वता आहेत. अशा बेनामी वृत्ताला आपण दुजोरा न देऊ नका. याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे तर हे सर्व आपोआप थांबेल. नराजी हे सर्व पक्षांमध्ये असते आणि निवडणुकीच्या आधी या गोष्टी होतात. परंतु, पक्षातील शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याची कला उद्धवजी, बाळासाहेब यांच्याकडे होती आणि आदित्यकडे पण ते आहे. ४५ ते ६० वयोगटातील शिवसैनिक कधी भयभीत होणार नाही. आणि आम्हाला ठाकरे कुटुंबाशी जोडून राहणे हे आमचे प्रथम कर्तृव्य आहे. त्यामुळे आम्हाला भयमीत करण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा महापौरांनी विरोधकांना दिला आहे.

Next Story
Share it
Top
To Top