...भोके पडलेल्या टिनपाटांना केंद्राची 'झेडप्लस' सुरक्षा! - उद्धव ठाकरे

...भोके पडलेल्या टिनपाटांना केंद्राची झेडप्लस सुरक्षा! - उद्धव ठाकरे

मुंबई | "टिनपाटांना झेडप्लस सुरक्षा देत आहात. पण काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही. परंतु, भोके पडलेल्या टिनपाटांना केंद्राची सुरक्षा देत आहे," असा टोमणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मारला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१४ मे) वांद्रेतील एमएमआरडीच्या मैदाना भव्य सभा पार पडली. या सभेत किरीट सोमय्यांचा उल्लेख टिनपाट असा केल्यानंतर उपस्थितांमध्ये हर्षा पिकला. सोमय्या हे सत्तात उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीय आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप करत आहेत. यावेळी सोमय्यांना मिळालेल्या झेडप्लस सुरक्षेवरून केंद्राला प्रश्न केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "टिनपाटांना झेडप्लस सुरक्षा देत आहात. मात्र, काश्मिरी पंडितांना सुरक्षा देत नाही. पण, इकडे भोके पडलेल्या टिनपाटाना केंद्राची झेडप्लसची सुरक्षा देत आहात. कुणाला वाय प्लस, कुणाला झेड प्लस काय बापाचा काम आहे?, हा लोकांचा पैसा आहे तो. ज्यांना केंद्राने सुरक्षा द्यायला पाहिजे, त्यांना ते देत नाही. ही असली गळकी टिनपाटे काय उपयोगाची तुम्हाला, टिनपाट हा सभ्य शब्द बोलतो, मला तर टमरेलच बोलायचे होते, असा हल्लाबोल त्यांनी केला.

टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार

औरंगाबादमध्ये अकबरुद्दीन ओवेसींची सभा झाली होती. त्यावेळी ओवेसींनी औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकवून आले. ही ए टीम, बी टीम, सी टीम काम करत आहेत. कुणाला औरंगजेबाच्या थडग्यांवर पाठवायचे, कुणा एकाच्या हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हाता हनुमान चालिसा द्याची आणि आपण मजा घेत बसायचे. मग, त्या लोकांवर कारवाई झाली की, आम्ही बोंबलायला मोकले. मग आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हेच तुमचे शौर्य, असा टोला मुख्यमंत्र्यांनी सोमय्यांना लगावला.Next Story
Share it
Top
To Top