मुंबई | तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही. हा डाव तुमच्यावरच उलटेल, असा धमकी वजा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने काल (२३ जानेवारी) शिवसैनिकांशी संवाद साधला. यानंतर आज (२४ जानेवारी) संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला आहे.
राऊत म्हणाले, "तुम्ही खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, तुमचे आयटीफायटी सेल आहेत ना. त्यातून तुम्ही बदनामी कराल किंवा हरेन पंड्यांवप्रमाणे गोळी माराल. यापलिकडे दुसरे तुम्ही काय करू शकता. तुम्ही शिवसेनेला खतम करू शकत नाही. हा डाव तुमच्यावर उलटेल. जेव्हा बाबरीनंतर शिवसेना उत्तर हिंदुस्तानात बाळासाहेब ठाकरेंची लहर होती. तेव्हा आम्ही उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, आणि जम्मू-काश्मीरपर्यंत जर आम्ही निवडणुका लढविली असती. तर जसे काल उद्धव ठाकरेंनी म्हटले की, देशात आमचा पंतप्रधान झाला असता. पण, आम्ही भाजपला सर्व सोडले. आणि आम्ही महाराष्ट्रात काम करू, हे बाळासाहेब ठाकरेंचा मोठेपणा होता. ते हिंदुरुदय सम्राट होते, जर एक हिंदू पार्टी देशात मोठे होत असेल तर आम्ही कोणतीही अडचण निर्माण करणार नाही. आपण एक विचार धारेचे लोक असून तुम्ही मोठे व्हा किंवा आम्ही मोठे होऊ, कारणे विचार मोठे होतात, असे बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते.