HW News Marathi
मनोरंजन

गांधीजींना पहिल्यांदा कोणी म्हटले महात्मा ?

अपर्णा गोतपागर | देशाला सत्य आणि अहिंसाचा मार्गावर चालण्याची शिकवन दिली. त्यांनी कोणत्याही प्रकारची न करता ब्रिटिशांपासून भारताला स्वतंत्र मिळविण्यास अमुल्य असे योगदान दिले. या सुपरहीरोला आज (२ ऑक्टोबर) करोड देशवासी नमन करत आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले.

महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदरमधील हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर राज्यात दिवाण म्हणून काम करत असत. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते.

गांधी यांना पहिल्यांदा कोणी म्हटले महात्मा ?

रवींद्रनाथ टागोर यांनी १२ एप्रिल १९१९ गांधींना लिहलेल्या एका पत्रात ‘महात्मा’ असे संबोधित केले होते. परंतु गांधींना पहिल्यांदा कोणी महात्मा म्हटले याबाबत इतिहासकारांमध्ये वाद आहे.

राजवैद जीवराम कालिदास यांनी १९१५ साली गांधींना ‘महात्मा’ संबोधित केल्याचे म्हटले जाते. मात्र काही लोकांच्या मते रवींद्रनाथ टागोर ही पहिले व्यक्ती आहेत, की ज्यांनी गांधींना ‘महात्मा’ म्हटले होते.

गांधींनी कोणी ‘राष्ट्रपिता’ म्हटले ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ४ जून १९४४ साली सिंगापूरमध्ये रेडिओच्या कार्यक्रमात संदेश देताना गांधींना ‘देशाचे पिता’ म्हटले होते.

तर काही लोकांच्या मते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ६ जुलाई १९४४ साली सिंगापूरमध्ये रेडिओ संदेश देताना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधित केले होते.

यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांनी ३० जानेवारी १९४७मध्ये गांधींची हत्या झाल्यानंतर देशवासीयांना रेडिओच्या माध्यमाने संबोधित करु गांधींची हत्या झाल्याची खबर सांगताना म्हटले होते की, ‘राष्ट्रपिता अब नहीं रहे’

मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा आणि राष्ट्रपिता या दोन्ही उपादींबाबत इतिहासत आणि इतिहासकारांमध्ये तर दुमते असली. गांधींना मिळालेल्या या उपाधींनी त्यांच्या कतृत्त्वाला एक वेगळे वलय आले हे मात्र तितकेच खरे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Diwas : भारत – पाक युद्धाचे परिणाम

News Desk

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | नानांच्या बाप्पाचे आगमन

News Desk