आगमन बाप्पाचे | विश्वकर्ता कला निकेतनचा ‘नॅनो गणेशा’

आगमन बाप्पाचे | विश्वकर्ता कला निकेतनचा ‘नॅनो गणेशा’

मुंबई | माहीमच्या मच्छीमार वसाहतीमध्ये राहणारे मूर्तिकार केतन विंदे यांना लहानपणापासून मूर्तिकले ची आवड होती. सुरुवातीच्या काळात 14 वर्षे गुरू रविकांत तांडेल यांच्या कार्यशाळेत यांच्या कार्यशाळेत केतन विंदे यांनी मुर्तीकलेचे शिक्षण घेतले. त्यांच्या हाताखाली काम केल्यानंतर 12 वर्षांपूर्वी केतन यांनी स्वतःच्या मूर्ती कार्यशाळेला सुरुवात केली. विश्वकर्ता कला निकेतन या केतन यांच्या कार्यशाळेतून गतवर्षी 50 मूर्ती थायलंड पाठविण्यात आल्या होत्या. सालाबादाप्रमाणे यंदाही केतन विंदेंच्या मुर्तींना परदेशातून मागणी आहे.

केतन यांच्या मुर्तीकलेचे काय आहे वैशिष्ट्य ?

शाडू मातीच्या सुबक मुर्ती हे केतन विंदेंच्या मुर्तीकलेचे विषेश वैशिष्ट्य असले तरीही डोळ्यांमधला जिवंतपणा गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेणारा असतो. तसेच दरवर्षी विंदे वेगळ्या काही डिझाइन नव्याने देण्याचा प्रयत्न करतात . गतवर्षी मोरावरचा गणपती, डमरू वरचा गणपती, मयूर कोच, रेड्डीचा गणपती असे काही फिझाईन होते तर यंदा जिजामाता आणि शिवरायांच्या वेशभूषेत असलेला गणपती, यशोदा आणि कृष्णाच्या भूमिकेत असलेला गणपती असे नवनविन डिझाइनमध्ये गणपती विंदेच्या कार्यशाळेत गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत.

कसा होतो गणेश भक्तांशी संपर्क

हल्ली तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयावर सक्रीय नसलेले कलाकार पहायला मिळणे दुर्मिळ आहे. परंतु केतन विंदे हे या सोशल मिडीयाच्या जाळ्यापासून प्रचंड दूर आहेत. ते केवळ आणि केवळ आपली कला जपण्यासाठी प्रयत्नशील असलेले पहायला मिळते. परंतु केतन यांची कला सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी केतन यांचे मित्र आणि नातेवाईंकांमध्ये तरुण मंडळी नेहमी प्रयत्न करतात. त्यामुळे गतवर्षी यु ट्युबच्या माध्यमातून केतन ची कला पाहून थायलंड ला गणपती घेऊन जाण्यासाठी थायलंड वरून काही नागरिक येऊन केतन यांच्या कार्यशाळेला भेट देऊन गेले. त्यानंतर 5 प्रकारच्या डिझाइन आणि 1.5 फुटाचे 7000-12,000 रुपये किंमती च्या 50 बाप्पाच्या मूर्ती भारतातून थायलंड ला पाठविण्यात आल्या.

यंदा कार्यशाळेत 2500- 25,000 किमतीच्या आणि 6 इंच ते 2.5 फूट उंचीच्या गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या असून मुंबईसह बेळगाव , कोल्हापूर, सुरत,गोवा, भोईसर, अमेरिका आशा विविध ठिकाणी पाठविण्यात येणार आहेत. थ्रीडी डोळे आणि नाजूक नक्षीकाम हुबेहूब रेखीव मूर्ती ही केतन यांच्या मूर्तिकलेची विषेश वैशिष्ट्ये मानली जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी 5 ते 6 इंचाचे शाडू मातीचे देखणी गणपती बनविण्यात केतन विंदेंचा हातखंडा आहे.

शाडू मातीची मुर्तीकला लुप्त होण्याच्या मार्गावर

दरवर्षी जागे अभावी 1-2 कारखाने बंद होतात. मातीकाम करणाऱ्या कामगारांची वानवा आहे. हे कारखाने बंद झाले तर आम्ही कलाकार रस्त्यावर येऊ. कारण यावर पूर्ण आयुष्य भर आम्ही काम केले आहे आणि आता रिडेव्हलपमेंट मुळे जागेचा अभाव निर्माण झाला आहे.सरकारने सपोर्ट करावा हि आमची तीव्र इच्छा आहे.

स्वता कोळी असल्यामुळे मला माहित आहे मासे पीओपी ने कमी आणि केमिकल रंगाने जास्त मरतात. नैसर्गिक रंगाचा वापर करा. मातीत काम केल्यामुळे निसर्गाची हाणी होत नाही. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा. असे मत मूर्तिकार केतन विंदे यांनी एच. डब्लू. मराठीशी बोलताना व्यक्त केले.


Next Story
Share it
Top
To Top