आगमन बाप्पाचे | माटुंग्याच्या बाजारपेठेत तामिळनाडूचे बाप्पा

आगमन बाप्पाचे | माटुंग्याच्या बाजारपेठेत तामिळनाडूचे बाप्पा

मुंबई | माटुंग्यासह धारावी विभागात दक्षिण भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लोक सणसमारंभ पूजाअर्चा दक्षिणात्य पद्धतीने करतात. त्यामुळे माटुंग्याच्या गिरी स्टोअर या दुकानामध्ये गेल्या सतरावर्षांपासून खास तामिळनाडूवरुन गणेश मुर्ती विक्रीसाठी आणुन ठेवल्या जातात. पारंपारीक पद्धतीच्या गणेशमुर्ती लोकांना उपलब्ध व्हाव्यात या हेतून या ठिकाणी गेली सतरा वर्षे गीरी स्टोअरमध्ये मुर्ती विक्रीसाठी ठेवल्या जातात.

५ इंचापासून दिड फुटापर्यंत या ठिकाणी गणेश मुर्ती उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांच्या किमती अगदी 100 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत आहेत. खास दक्षिण भारतीय विभूतींची तीन बोटे आणि सोंडेत असलेले जलकुंड ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आकर्षक सुंदर आणि माफक दरात असलेल्या या गणेश मुर्ती घेण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. तब्बल 3 हजारांवर आलेल्या या इकोफ्रेंडली मूर्तींपैकी 80 टक्के मूर्ती आधीच विकल्या गेल्या आहेत.


Next Story
Share it
Top
To Top