मुंबई | तेलंगणामध्ये एका समलैंगिक जोडप्याने विवाह केल्याची माहिती प्रसार माध्यमांतून मिळाली आहे. या दोन्ही समलैंगिक जोडप्यांचा विवाह सोहळा शनिवारी (१८ डिसेंबर) तेलगंणात पार पडला आहे.तेलगंणा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला समलैंगिक विवाह सोहळा असल्याची म्हटले जाते. हैद्राबाद शहराजवळ असलेल्या एका रिसॉर्ट सुप्रियो चक्रबर्ती आणि अभय डांगे यांचे लग्न झाले. या दोघेही गेल्या आठ वर्षापासून रिलेशनशीपमध्यो होते. आमचा विवाह कायदेशीर नसले, तरी देखील 'आम्ही आता ऑफिशलीअली एकमेकांचे झालो', अशी घोषणा करत भारतातील एका समलैंगिक करत एक जंगी पार्टी दिली आहे.
या जोडप्याने जवळपास ६० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला आहे. याआधी भारतात समलैंगिक जोडप्यांचा विवाह झाले का? यासंदर्भात अधिकृत अशी अद्याप माहिती मिळाली नाही. परंतु अनेक जण लपून-छपून विवाह केल्याचे म्हटले जाते. पण या दोन्ही जोडप्यांनी अधिकृतपणे विवाह केल्याची माहिती प्रसार माध्यमांतून समोर आली आहे. सुप्रियो चक्रबर्ती आणि अभय डांगे असे या दोन समलैंगिक जोडप्यांचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सुप्रियो हा हैदराबादमध्ये एका हॉटेल मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये लेक्चरर आहे. तर अभय एका सॉफ्टवेअर कंपनीत डेव्हलपर आहे. हे दोघे एकमेंकांना आठ वर्षापासून ओळखत असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. यानंतर दोघांनी थाटामाटात विवाह सोहळा केला. या समलैंगिक जोडप्यानी तेलंगणातील विक्रमाबाद हायवेच्या ट्रान्स ग्रीनफिल्ड रिसॉर्टमध्ये या विवाह सोहळा पार पडला.