आता ते आईसोबत स्वर्गात असतील!; वडिलांच्या निधनानंतर मुलगी मल्लिका दुआ यांची भावनिक पोस्ट

आता ते आईसोबत स्वर्गात असतील!; वडिलांच्या निधनानंतर मुलगी मल्लिका दुआ यांची भावनिक पोस्ट

नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार आणि एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. दुआ यांनी आज (४ डिसेंबर) वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दुआ यांच्यावर उद्या (५ डिसेंबर) दुपारी १२ वाजता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांची कन्या मल्लिका दुआ यांनी दिली आहे. मल्लिका दुआ यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची दु : खद बातमी दिली.

अपोलो रुग्णालयातपूर्वी दुआ यांना रविवारी (२८ नोव्हेंबर) रात्री परमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीच्या परमानंद रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु डॉक्टरांच्या सल्लानुसार दुआ यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच दुआ यांची प्रकृती गेल्या काही महिन्यापासून खालावलेली. काहीच महिन्यांपूर्वी दुआ यांच्या पत्नी चिन्ना दुआ यांचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतर विनोद दुआ यांचीही प्रकृती सातत्याने खालावत गेली होती. दरम्यान, विनोद दुआ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ते फुफ्फुसांशी संबंधित आजाराने ग्रस्त होते

मल्लिका दुआ यांनी इंस्टाग्राम स्टोरीत म्हटले, "निर्भिड आणि असामान्य माझे वडिल विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. माझ्या वडिलांनी एक अतुलनीय जीवन जगले. त्यांनी आपल्या आयुष्याची ४२ वर्षे फक्त आणि फक्त सत्याचीच कास धरत पत्रकारीतेला दिली. ते आता माझे वडिल आईसोबत स्वर्गात असतील."


Next Story
Share it
Top
To Top