काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रचला पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रचला पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

मुंबई | काँग्रेसचे हाय कमांड आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी या दोघांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काल (१२ जानेवारी) एका वृत्त वाहिनीशी बोलताना केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारी (५ जानेवारी) नियोजित पंजाबच्या दौऱ्यासाठी निघाले होते. परंतु पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेत पंजाब सरकारकडून त्रुटी असल्याचा आरोप शर्मांनी यावेळी बोलताना केला आहे.

वृत्तवाहिनीशी बोलताना शर्मांनी सांगितले, "काँग्रेस हायकमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याचा कट रचला होता," असा दावा त्यांनी केला. पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील गोंधळाच्या वेळी केलेल्या स्टींग ऑपरेशनदरम्यान, पंजाबमधील पोलिसांना २ जानेवारी रोजी पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट रचल्याची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

पंतप्रधानांनी ५ जानेवारी रोजी फिरोजपूर येथील एका सभेसाठी निघालेल्या त्यांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी आडवला. त्यामुळे मोदींना भटिंडामधील पुलावर १५ ते २० मिनिटे अडकले होते. यानंतर पंतप्रधानांनी त्यांचा पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले. पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ होणार होता. परंतु, पंप्रधानांनी दौरा रद्द केल्यामुळे ही सर्व विकासकामे लांबणीवर गेली.
Next Story
Share it
Top
To Top