UP Election 2022: अखिलेश यादवांना फक्त दलितांची मते हवीत! - चंद्रशेखर आझाद

UP Election 2022: अखिलेश यादवांना फक्त दलितांची मते हवीत! -  चंद्रशेखर आझाद

लखनऊ | उत्तर प्रदेशात निवडणुकीचे पडघम वाजला सुरुवात झाली आहे. भीम आर्मी आणि समाजवादी पार्टीची उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत न करण्याचा निर्णय घेतला आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले आहे. चंद्रशेखर आझाद यांनी आज (१५ जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन समाजवादीसोबत सुत जुळत नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.

चंद्रशेखर म्हणाले, "गेल्या महिन्याभरापासून अखिलेश यादव यांच्या आम्ही संपर्कात होतो. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी दलितांची मते हवी आहेत. पण अखिलेश यादव यांना आघाडीत दलितांची मते हवी आहेत. अखिलेश यादव यांनी काल (१४ जानेवारी) बहुजन समाजाचा अपमान केला. अखिलेश यादव आम्हाला आघाडीत केवळ एकच जागा देणार असल्याचे म्हटले. यामुळे समाजवादी पार्टी आणि भीम आर्मी यांच्यात आघाडी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

"माझ्याविरोधात शेकडो गुन्हे दाखल केले असून मी १६ महिने तुरुंगात देखील होतो. मी एवढे सगळे करून देखील अखिलेश यादव यांना दलित नेता नको, त्यांना फक्त दलितांची मते हवी आहेत. अखिलेश यांना वंचितांची काळजी आहे की नाही, याची मला चिंता वाटत आहे. मला पाठीचा त्रास होत असून देखील मी दोन दिवसांपासून लखनऊमध्ये त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. पण, अखिलेश यांना मला चांगला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता समाजवादी पार्टीसोबत आघाडी होणार नाही," असे ते म्हणाले.

सात टप्प्यात होणार उत्तर प्रदेशाच्या निवडणुका

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या एकूण ४०३ जागा आहेत. उत्तर प्रदेशाचे निवडणुका सात टप्प्यात मतदान होणार असून पहिला टप्पा १० फेब्रुवारी, दुसरा टप्पा १४ फेब्रुवारी, तिसरा टप्पा २० फेब्रुवारी, चौथा टप्पा २३ फेब्रुवारी, पाचवा टप्पा २७ फेब्रुवारी, सहावा टप्पा ३ मार्च आणि सातवा टप्पा ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे.

Next Story
Share it
Top
To Top