लखीमपूर हिंसाचारप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणतात महाराष्ट्रासारख्या धनाढ्य राज्यासोबत बिहारची तुलना कशी काय ?

लखीमपूर हिंसाचारप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणतात महाराष्ट्रासारख्या धनाढ्य राज्यासोबत बिहारची तुलना कशी काय ?

पाटणा | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लखीमपूरच्या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वर्तमानपत्रांमध्ये पाहिलं आहे. त्यावर सरकार कारवाई करेल, असं नितीशकुमार म्हणाले. लखीमपूर खीरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारामुळे देशात नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांचे नेत्यांनी या प्रकरणावरून केंद्र आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

जातीनिहाय जनगणनेवरील एका प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. जातीनिहाय जनगणनेवरील आमची भूमिका कायम आहे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, असं आमचं मत आहे. ज्या पंतप्रधानांना जे शिष्टमंडळ भेटायला गेले होते, यासंदर्भात त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाईल. पुढे काय करायचं हे बैठकीत निश्चित केलं जाईल. सर्व पक्षांशी चर्चा सुरू आहे. पण आता पोटनिवडणूक आहे. पोटनिवडणू संपल्यावर यावर बैठक घेतली जाईल. सर्व पक्ष एकत्रितपणे एकमताने निर्णय घेतील, अशी खात्री असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्रासारख्या धनाढ्य राज्यासोबत बिहारची तुलना कशी काय होऊ शकते

वृत्तपत्रांमध्ये आम्ही बघितलं आहे. कारवाई होईलही. तिथे जे काही घडले आहे, त्याची बातमी आली आहे. वृत्तपत्रांमध्ये ठळक बातमी आहे. पण ही उत्तर प्रदेशातील घटना आहे. तिथे जे काही घडले ते सरकार बघेल आणि योग्य पावले उचलली पाहिजेत. कारवाई केली पाहिजे, असं मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.महाराष्ट्रासारख्या धनाढ्य राज्यासोबत बिहारची तुलना कशी काय होऊ शकते. पुढच्या वेळी नीती आयोगाची बैठक होईल आणि आम्हाला जाण्याची संधी मिळाली तर आम्ही नीती आयोगाकडे हा मुद्दा मांडू, असं नितीशकुमार यांनी सांगितलं. नीती आयोगाला बिहारची स्थिती माहिती आहे का? अनेर मागास राज्य आणि विकसित राज्यांना वेगवगेळं समजून चाललं पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली.


Next Story
Share it
Top
To Top