बिकानेर एक्सप्रेसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

बिकानेर एक्सप्रेसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये आज (१३ जानेवारी) रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. जलपाईगुडी परिसरात मैनगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. बिहारमधील पाटणा येथून आसामच्या गुवाहाटी येथे जात असताना एक्सप्रेसचा हा अपघात झाला असून या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेविषयी कळताच रेल्वे प्रशासनासह पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्याचं काम सुरू आहे.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी-दोमोहानी स्टेशनदरम्यान एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात घडलाय. आज सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. यात अनेक प्रवासी अपघातात जखमी झाले असून जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एक्स्प्रेसचे काही डबे एकमेकांवर चढले असून डब्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.


दरम्यान, या एक्स्प्रेसमध्ये पाटणा रेल्वे स्थानकावरून साधारण ९८ प्रवासी प्रवास करत होते. तसेच ३ प्रवासी मोकामा येथून तर २ प्रवासी बख्तीयारपूर येथून चढले होते, पाटण्यातील आरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली आहे. त्याचबरोबर अपघाताच्या माहितीसाठी प्रशासनाकडून दोन हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. तर मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.


Next Story
Share it
Top
To Top