UP Elections 2022 : काँग्रेसकडून उमदेवारांची पहिली यादी जाहीर; उन्नाव बलात्कार पीडितेच्या आई उमेदवारी

UP Elections 2022 :  काँग्रेसकडून उमदेवारांची पहिली यादी जाहीर; उन्नाव बलात्कार पीडितेच्या आई उमेदवारी

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे वेळा पत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. यानंतर आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादी ४० टक्के महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. या यादीत काँग्रेसने उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला तिकीट दिल्यांने सर्वांच्या भुवया उचावल्या आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज (१३ जानेवारी) पत्रकार परिषद काँग्रसेची उमेदवारी जाहीर केली.

उत्तर प्रदेशमध्ये २०१७ मधील उन्नाव बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता. या प्रकरणात भाजपचे तत्कालीन आमदार कुलदीप सेनगर यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होते. या प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगरला १० वर्षांचा कारावास आणि १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणानंतर भाजपने पक्षातून त्यांचे निलंबित केले आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आता भाजपला घेरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या पीडितेच्या आईचे नाव आशा सिंह असे नाव आहे. काँग्रेसने त्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. पीडितेच्या आईला उन्नावमतदार संघतून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईसोबत पूनम पांडे यांना देखील उमेदवारी दिली आहे. पांडेंना २०२० मध्ये शाहजगानपूरमध्ये योगींना भेटण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्यासोबत पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशमध्ये बराच वादविवाद झाला होता.


Next Story
Share it
Top
To Top