HW News Marathi
Covid-19

करोनाची तिसरी लाट; पुढील तीन महिने महत्त्वाचे, केंद्राचे राज्यांना तयार राहण्याचे निर्देश

नवी दिल्ली | करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत पुढील तीन महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महत्त्वाचे ठरू शकतात. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) आणि लसीकरणााबबत नेमलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी याबाबत इशारा दिला आहे. राज्यांनी यासाठी पूर्णपणे तयार राहावं, असं पॉल म्हणाले. तसंच आगामी दोन महिन्यांत सणासुदीच्या काळात करोनासंबंधी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन पॉल यांनी नागरिकांना केलं आहे.

राज्यांनी यासाठी पूर्णपणे तयार राहावं

नवी दिल्लीः करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत पुढील तीन महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महत्त्वाचे ठरू शकतात. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) आणि लसीकरणाबबत नेमलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी याबाबत इशारा दिला आहे. राज्यांनी यासाठी पूर्णपणे तयार राहावं, असं पॉल म्हणाले. तसंच आगामी दोन महिन्यांत सणासुदीच्या काळात करोनासंबंधी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन पॉल यांनी नागरिकांना केलं आहे.

तिसरी लाट रोखण्यासाठी सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा आणि करोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं आणि लस घ्यावी, असं डॉक्टर व्ही. के. पॉल म्हणाले. लसीमुळे करोनापासून सुरक्षा मिळते. तसंच तिसऱ्या लाटेची गंभीरता कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असं डॉक्टर पॉल यांनी सांगितलं. करोनावरील लसीच्या एका डोसमुळेह जवळपास ९७ टक्के मृत्यूंचा धोका कमी होत आहे, असं गेल्या काही दिवसांपूर्वी आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर ! बाप्पाच्या दर्शनाला गावी जाताना आता ई पासची गरज नाही

News Desk

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी

News Desk

महाराष्ट्राने लसीकरणाचा वेग दुप्पट करावा, प्रकाश जावडेकरांची विनंती

News Desk