डोंबिवली बलात्कार : 33 आरोपींची नावं समोर, आतापर्यंत 28 जण ताब्यात

डोंबिवली बलात्कार : 33 आरोपींची नावं समोर, आतापर्यंत 28 जण ताब्यात

डोंबिवली | सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या प्रकरणात आतापर्यंत 33 आरोपींची नावं समोर आली आहेत. त्यापैकी 28 जणांना ताब्यात घेतलं आहे. 2 आरोपी अल्पवयीन आहेत."पीडित तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सोनाली ढोलेंनी दिली. "पीडित तरुणी बहुतांश आरोपींना आधीपासून ओळखत होती. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडित मुलीची आणि काही आरोपींची ओळख झाली होती," असं सोनाली ढोलेंनी सांगितलं.

आरोपींचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असल्याचं आढळलेलं नाही

तसंच, आरोपींचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असल्याचं आढळलेलं नाही, असंही डोले म्हणाल्या.पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमलं आहे. यात सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्त्वात प्रकरणाचा तपास केला जात आहे. पीडितेच्या आरोपानुसार, "घरी येणं जाणं असलेला एक मित्र होता. जानेवारी महिन्यात तिला भेटण्यासाठी सकाळी 9.40 च्या सुमारास त्याचा (मुख्य आरोपी) फोन आला. पीडित मुलगी सकाळी 11 च्या सुमारास त्याला भेटायला गेली. तर मुख्य आरोपी ऑटो चालवणाऱ्या त्याच्या मित्रासोबत आला होता. ते एका मैत्रिणीच्या घरी जात होते. वाटेत दुसरा मुलगा त्यांच्यासोबत ऑटोमध्ये बसला."

दरवेळी अशी धमकी देऊन तिला विविध ठिकाणी नेलं जात होतं.

त्यानंतर पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह राहण्यासाठी वेगळ्या ठिकाणी गेली. या दरम्यान मुख्य आरोपी तिला सतत फोन करायचा, पण ती त्याचे कॉल टाळत होती. 20 फेब्रुवारी, 2021 रोजी मुख्य आरोपीने तिला वेगळ्या क्रमांकावरून फोन केला आणि तिला भेटायला सांगितलं पण तिने नकार दिला. दुसऱ्या दिवशी तो तिच्या घराजवळ गेला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली की, तो तिच्या कुटुंबाला व्हीडिओ दाखवेल आणि सार्वजनिक करेल. यामुळे पीडित तरुणी घाबरली आणि त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली.मुख्य आरोपीने तिला गुंगीचे औषध टाकून पाणी दिले. यामुळे ती बेशुद्ध झाली. तिला जाग आली तेव्हा तिच्या गुप्तांगात वेदना होत होत्या. दरम्यान, तिला दरवेळी अशी धमकी देऊन तिला विविध ठिकाणी नेलं जात होतं.

त्यानंतर 15 मे, 2021 रोजी पीडित तरुणी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हीडिओ शेअर करण्यात आला आणि धमकी देऊन पीडितेला दारू पाजण्यात आली. त्यानंतर तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यात आला. यावेळी फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या 11 मुलांनी तिच्यावर बलात्कार केला.


Next Story
Share it
Top
To Top