HW News Marathi
देश / विदेश

‘तेव्हा’ रात्री मी शहांना कॉल केला होता; राऊतांचा मोठा खुलासा

मुंबई | माझ्या नातेवाईकांनाच्या घरी ईडीचे अधिकारी मध्यरात्री छापे मारले होते. त्या रात्री मी अमित शाहांना कॉल केला होता. मला तुमच्याबद्दल अतिशय आदर आहे. माझ्याशी दुश्मनी आहे, तर मला अटक करा. माझे नातेवाईक, मित्र, निकटवर्तीय त्यांना का टॉर्चर करता?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी  विचारला होता. राऊतांनी आज (१५ फेब्रुवारी) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ई़डीवर हल्लाबोल केला आहे.

राऊत म्हणाले, “गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते मला दिल्लीत भेटले होते. तुम्ही राज्य सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी आम्ही तयार आहोत. बहुमत नसताना राज्यातील महाविकासआघाडीचे तुम्ही कसे पाडणार, असा सवाल मी विचारला होता. तेव्हा ते म्हटले की, आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू किंवा आमदार फोडू, असे त्यांनी मला उत्तर दिले. मी महाविकासआघाडी सरकारला नख लागेल असे कोणतेही कृत्य करणार नाही, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. यानंतर माझ्या माझ्या नातेवाईकांनाच्या घरी माझ्या नातेवाईकांनाच्या घरी ईडीचे अधिकारी मध्यरात्री छापे मारले होते”

 राऊतांनी दलाल’ ‘भडवा’ XXX- संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा वादग्रस्त उल्लेख केला आहे. माझं ‘त्या दलाला’ आव्हान, आपण सगळे ४ बसेस करू आणि आपण ‘त्या’ १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, आणि जर तुम्हाला ते १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, आणि जर दिसले नाहीत तर त्या दलाला जोड्याने मारू”, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीगडमध्ये नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यात बेपत्ता असलेले १७ जवान शहीद

News Desk

शंकरसिंह वाघेला यांची कॉँग्रेसमधून हकालपट्टी

News Desk

राम मंदिर भूमिपूजनाबाबत पवारांच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा ..’शरद पवारांचं बरोबर आहे’

News Desk