Goa election 2022: भूमाफिया, भ्रष्टाचारी आणि ड्रग्ज माफियांच्या हाती गोव्याच्या राजकारणाची सूत्रे! - संजय राऊत

Goa election 2022: भूमाफिया, भ्रष्टाचारी आणि ड्रग्ज माफियांच्या हाती गोव्याच्या राजकारणाची सूत्रे! - संजय राऊत

मुंबई | भूमाफिया, भ्रष्टाचारी आणि ड्रग्ज माफिया यांच्या हाती गोव्याच्या राजकारणाची सूत्रे आहेत. आणि आता हे लोक गोव्याचे भविष्य ठरवित आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज (१६ जानेवारी) पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला आहे.

संजय राऊत म्हणाले, "गोव्यामधील सर्वसामान्य लोकांन प्रस्थापितांविरूद्ध आम्ही उभा करू. गोव्यातील सध्याचे राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेली आहे. म्हणजे भूमाफिया, भ्रष्टाचारी आणि ड्रग्ज माफिया यांच्या हाती गोव्याच्या राजकारणाची सूत्रे आहेत. आणि आता हे लोक गोव्याचे भविष्य ठरवित आहेत. हे जर गोवेकरांना मोडायचे असेल तर त्यांनी आपल्यातील सामान्य लोकांना गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करावे आणि निवडून आणावे. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. बाळासाहेब ठाकरेंनी सर्व सामान्यामधील माणसाला उमेदवारी देऊन आमदार, खासदार आणि मंत्री केले. गोव्यात असे करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे,"

गोव्यात काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेसने गोव्यात अनेक वर्ष सत्तेत राहिली असून गेल्यावेळी काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते. आता काँग्रेसकडे फक्त दोन-तीन आमदार राहिले आहेत. गोव्यात काँग्रेसला पाठिंबा असेल ते निवडणुकीत दिसून येईल. तसेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची महाराष्ट्रमध्ये आघाडी आहे. परंतु गोव्यात जागा वाटपाबाबत काही मजबुरी असेल, आमची चर्चा देखली सुरू होती. मात्र, ते होऊ शकले नाही. आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा फिस्कटली असली तर याचा अर्थ असा होत नहा की आम्ही निवडणूक लढणार नाही, असे राऊत म्हणाले.

तृणमूल काँग्रेस आणि आपवर राऊतांचा निशाणा

तृणमूल काँग्रेस तर मनाने सत्तेत आलेली आहे, अशा पद्धतीचा त्यांचा वापर आहे. असू द्या. तर आम आदमी पार्टीचे देखील असेच चित्र दिसत आहे. त्यांना केवळ शपथ घेणेच बाकी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री काल गोव्यात दारोदारी प्रचार करत होते. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आणि येथे ते दारोरदारी जऊन प्रचार करत आहे. तुम्ही जेव्हा ते स्वत: दारोदार जात होतात. तेव्हा मी स्वत: त्यांना पाहिले आहेत. चांगली गोष्ट आहे आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत, परंतु पाहुयात गोव्यात काय होते," असे म्हणत राऊतांनी तृणमूल काँग्रेस आणि आपवर टीका केली.
Next Story
Share it
Top
To Top