नवी दिल्ली | हिमाचल प्रदेशमधील कुल्लूमध्ये प्रवाशांनी भरलेली खाजगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत २० जणांनी जागीच जीव गमावला आहे. तर ३० लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. खमींना उपचारासाठी बंजार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुल्लूवरून गाडागुशैनीकडे जाताना बसला अपघात झाला आहे.
https://twitter.com/ANI/status/1141701214238679041
कुल्लू जिल्ह्यातील बंजारुपासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भियोठ वळणावर बस चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस ५०० फूट दरीमध्ये कोसळली. बसमध्ये जवळपास ४० ते ५० प्रवाशी होते. दरीत कोसळल्याने बसचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.