जाणून घ्या... ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचा जीवनप्रवास

जाणून घ्या... ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचा जीवनप्रवास

मुंबई | ज्येष्ठ पत्रकार आणि एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. दुआ यांनी आज (४ डिसेंबर) वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुआ यांच्यावर दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. विनोद दुआ यांची कन्या मल्लिका दुआ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची दु : खद बातमी दिली आहे. विनोद दुआ यांच्या पार्थिवावर उद्या (५ डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेल्या काही महिनांपासून विनोद दुआ यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. दिल्लीच्या परमानंद रुग्णालयात दुआ यांना २८ नोव्हेंबर रात्री दाखल करण्यात आले होते. यानंतर दिल्लीच्या परमानंद रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु डॉक्टरांच्या सल्लानुसार दुआ यांना २९ नोव्हेंबर रात्री दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांची कन्या मल्लिका दुआ यांनीही इंस्टाग्रामवर स्टोरीवर दिली.

दुआ यांचा अल्पपरिचय

विनोद दुआ यांनी १९७४ मध्ये दूरदर्शनपासून पत्रकारितेच्या कारकिर्द सुरू केली आहे. यानंतर विनोद दुआ यांनी एनडीटीव्ही, सहारा अशा इतरही वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी काम केली आहेत. दुआ यांचा जन्म तेव्हाच्या डेरा इस्माईल खान आणि सध्याच्या पाकिस्तानातील खैबर-पख्तुन्वा प्रांतात झाला होता. दुआ यांचे बालपण निर्वासितांच्या छावणीत गेले असून दुआ त्यांनी बोफोर्स प्रकरणात घेतलेल्या विविध मंत्र्यांच्या मुलाखती चांगल्याच गाजल्या होत्या. तसेच दुआ यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या कामासाठी त्यांना १९९६ मध्ये रामनाथ गोएंका आणि २००८ मध्ये पद्मश्री अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनीही गौरविण्यात आले. विनोद दुआ यांनी २०१८ मध्ये HW न्यूज नेटवर्कमध्ये त्यांचा नवी सफर सुरू केला होता. HW न्यूज नेटवर्कसोबत विनोद दुआ यांनी 'द विनोद दुआ शो' जवळपास ४६४ शो केले आहेत.

दुआ यांची कारकिर्द

 • जन्म ११ मार्च १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला.
 • दुआ यांचे कुटुंबिय १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर खैबर पख्तुनख्वा येथून आले होते.
 • विनोद दुआ हे दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज महाविद्यालयातून इंग्रजी विषयात पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली.

 • दुआ यांना शालेय आणि महाविद्यालयीन दिवसांमध्ये गायन आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि दुआ यांनी त्यावेळी अनेक थिएटर देखील केले.
 • १९८५ मध्ये दुआ यांनी 'जवन तरंग' या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन केली.
 • जनवाणी (लोकांचा आवाज) नावाचा कार्यक्रम सुरू केला. अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सर्वसामान्यांना थेट मंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली होती.

 • १९८७ साली दुआ यांना प्रोड्यूसर म्हणून एनडी टीव्ही टुडे मध्ये कामाला सुरुवता केली.
 • १९९२ साली विनोद दुआ यांनी झी टीव्हीवर प्रसारित होणारा "चक्रव्यूह" हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
 • १९९२ ते १९९६ पर्यंत दुआ यांनी दूरदर्शन (DD) वर प्रसारित होणारे साप्ताहिक चालू घडामोडी मासिक "परख" चे निर्माते होते.
 • १९९६ मध्ये दुआ यांनी पत्रकारितेतील उत्कृष्ट भूमिकेसाठी बी.डी. गोएंका पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार होते.
 • दूरदर्शन प्रसारित होणाऱ्यात "तसवीर-ए-हिंद" (१९९७-१९८८) कार्यक्रम त्यांनी सूत्रसंचालन केला.
 • २००० ते २००३ पर्यंत ते सहारा टीव्हीशी जोडले गेले होते, त्यामुळे त्यांनी “प्रदायनी” आणि “परख” हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 • विनोद दुआ यांनी २०१८ मध्ये HW न्यूज नेटवर्कमध्ये त्यांचा नवी सफर सुरू केला होता. HW न्यूज नेटवर्कसोबत विनोद दुआ यांनी 'द विनोद दुआ शो' जवळपास ४६४ शो केले आहेत.


Next Story
Share it
Top
To Top