HW News Marathi
देश / विदेश

‘पणजी हाच माझा एकमेव पर्याय’; भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उत्पल पर्रिकरांची प्रतिक्रिया

पणजी | भाजपने गोवा विधानसभा निवडणूकांसाठी आज (२० जानेवारी) ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीतून मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना डावलण्यात आलं आहे. त्यांच्या ऐवजी बाबूश मोन्सेरात यांना पणजी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. तर पर्रिकरांना बिचोलीतून तिकिट देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. मात्र, पर्रिकर यांनी आपण पणजीतूनच निवडणूक लढवणार आहोत, असं स्पष्ट सांगितलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून उत्पल पर्रीकरांनी पणजी मतदारसंघातून लढण्याची भूमिका मांडली होती. तर काहीही झाले तरी आपण पणजीतूनच लढणार असंही त्यांनी म्हटलं होतं. तसेच जर भाजपने तिकीट नाही दिलं तर आपण अपक्ष म्हणून पणजीतून लढू असंही त्यांनी म्हटलं होतं. राज्यसभेच्या माध्यमातून थेट केंद्रात जाणे नाहीतर पणजी व्यतिरिक्त इतर मतदारसंघातून निवडणूक लढवणे, असे दोन पर्याय पर्रीकरांसमोर ठेवल्याचे देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. पणजीमधून निवडून येण्याची ताकद नसल्याचे सांगत त्यांना दुसऱ्या कुठल्यातरी सेफ मतदारसंघातून निवडणूक लढवा, असे सांगण्यात आले होते. मात्र, हे दोन्हीही पर्याय

दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा विचार नाही

भाजपने उत्पल पर्रीकरांसमोर दोन पर्याय ठेवल्याचे देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यापैकी एक म्हणजे राज्यसभेच्या माध्यमातून थेट केंद्रात जाणे किंवा पणजी सोडून दुसऱ्या एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे. पणजीमधून निवडून येण्याची ताकद नसल्याचे सांगत त्यांना दुसऱ्या एखाद्या सेफ मतदारसंघातून निवडणूक लढवा, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतू हे दोन्हीही पर्याय उत्पल पर्रीकरांनी नाकारले आहेत. आपली भूमिका ठाम आहे, असे म्हणत मी पणजीतूनच लढणार, असं त्यांनी सांगितलं आहे. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही. यापुढे माझी भूमिका काय असेल ते मी लवकरच जाहीर करेन. परंतु, पणजी हाच माझा एकमेव पर्याय आहे”, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रिकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारच्या पार

News Desk

नवनीत राणा आक्रमक, अरविंद सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार

News Desk

जाती धर्म भेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा | रामदास आठवले

News Desk