राजस्थानमध्ये मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू, ४५ जण जखमी

राजस्थानमध्ये मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू, ४५ जण जखमी

जयपूर | राजस्थानच्या बाडमेरमधील राम कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान कार्यक्रमाच मंडप कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे कोसळ्याची माहिती मिळाली आहे. कोसळलेला तंबू आणि पावसामुळे करंटसुद्धा पसरला होता अशी माहिती समोर आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1142770774492798977

या दुर्घटनेत मंडपाच्या तंबूखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजस्थान प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली.

https://twitter.com/PMOIndia/status/1142768930706153472


Next Story
Share it
Top
To Top