महिलांना उच्चशिक्षणाची परवानगी; मात्र...

महिलांना उच्चशिक्षणाची परवानगी; मात्र...

काबूल | हक्कानी याने आज पत्रकार परिषद घेत शिक्षणाबाबत काही नवीन धोरणे जाहीर केली. तालिबानच्या आधीच्या सत्ताकाळात मुलींना आणि महिलांना शिक्षण घेण्यास बंदी होती. एवढेच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी वावरण्यासाठीही त्यांच्यावर बंधने होती. आता मात्र, आपण बदललो असल्याचा दावा तालिबानने केला असून ते किती प्रमाणात बदलले आहेत, त्याकडे जगाचे लक्ष आहे. ‘आम्हाला पुन्हा आमचे घड्याळ वीस वर्षे मागे न्यायचे नाही. सध्या जे आहे, त्याचाच आधार घेऊन तालिबानला पुढे जायचे आहे,’ असे सांगत हक्कानी याने महिलांना शिक्षणाची परवानगी असल्याचे जाहीर केले. णाऱ्या महिलांविरोधात त्यांनी बळाचा वापर केला होता.

विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठीचे वर्ग वेगळे असतील

अफगाणिस्तानात विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या महिलांना त्यांचे शिक्षण पुढे सुरु ठेवता येईल, पदव्युत्तर शिक्षणही घेता येईल, असे स्पष्टीकरण तालिबान सरकारने आज दिले आहे. अर्थात, विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठीचे वर्ग वेगळे असतील आणि इस्लामिक पद्धतीचे कपडे घालणे अत्यावश्‍यक आहे, असे तालिबान सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी याने स्पष्ट केले आहे.

‘विद्यापीठात महिलांना उच्च शिक्षणही घेता येईल. मात्र, त्यांना हिजाब घालणे सक्तीचे असेल. विद्यापीठांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या विषयांचाही आढावा घेतला जाईल,’ असे त्याने स्पष्ट केले. तालिबानच्या आधीच्या सत्तेवेळी त्यांनी संगीत आणि कला शिक्षणावर बंदी घातली होती. महिलांबद्दलचा आपला दृष्टीकोन बदलला असल्याचा दावाही तालिबानने केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच समान हक्कांची मागणी करत मोर्चा काढ


Next Story
Share it
Top
To Top