नवी दिल्ली | उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर याचा राहत्या घरी १६ एप्रिल रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. रोहित शेखर तिवारी डिफेन्स कॉलनीतील घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
https://twitter.com/ANI/status/1119186913221644288
एम्स रुग्णालयात १७ एप्रिल रोजी पाच डॉक्टरांच्या टीमने रोहित शेखरच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम केले होते. त्याचा अहवाल अखेर आज (१९ एप्रिल) समोर आला असून त्यात रोहित शेखर याचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रोहित शेखर तोंड दाबून हत्या करण्यात आली असावी, असेही या अहवालात म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित तिवारीच्या मृत्यूचा संपूर्ण तपास क्राईम ब्रान्चकडे सोपवण्यात आला. यानंतर फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रान्चच्या अधिकाऱ्यांनी रोहितच्या घराची झाडाझडती केली. यावेळी अधिकाऱ्यांनी रोहित ज्या ठिकाणी नोकरांना नाकातून रक्त येत असल्याच्या स्थितीत आढळून आला होता त्या जागेची तपासणी केली.
मागील वर्षी १८ ऑक्टोबर २०१८ रोजी एनडी तिवारी यांचे निधन झाले होते. २००८ मध्ये रोहित शेखरने न्यायालयात खटला दाखल करून एनडी तिवारीच आपले बायोलॉजिकल वडील असल्याचा दावा केला होता. डीएनए रिपोर्टमध्ये ही बाब उघडकीस आल्यानंतर मोठ्या कायदेशीर लढाईनंतर एनडी तिवारींनी राहुल शेअर आपला मुलगा असल्याचे मान्य केले होते. यानंतर तिवारी यांनी २०१४ मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी लग्न केले होते.