HW News Marathi
देश / विदेश

#RussiaUkraineConflict : रशियाचा युक्रेनवर मिसाईल हल्ला; “मध्ये आलात तर महागात पडेल” – पुतीन यांची धमकी

नवी दिल्ली | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याची आदेश दिले. यानंतर काही क्षणातच रशियाने युक्रेनच्या कीव आणि खारकीव या दोन शहरात मिसाईल हल्ला केल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या लष्करी कारवाईत पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पुतीनने इतर राष्ट्रांना दिली आहे. यामुळे आता रशिया-युक्रीने युद्ध अटळ असून या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. 

दरम्यान, पुतीनने युक्रेनच्या सैन्याला शरण येण्यास सांगितली असून युक्रेनमध्ये काल (२३ फेब्रुवारी) आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाचे सैन्य सीमारेषेवर परिस्थिती चिघळत आहे. रशियाने कीवमध्ये मिसाईल हल्ल्याच्या वेळी नागरिकांमध्ये  जीव वाचवण्यासाठी डग्राऊंड मेट्रो स्थानकांमध्ये आसरा घेतला आहे. यापूर्वी पुतीनने २१ फेब्रुवारी रोजी देशातील जनतेला रशियातील जनतेला संबोधित करताना युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुगंस्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून घोषणा केली होती. रशियाने केलेल्या हल्ल्याची माहिती युक्रेनच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्र संघाला सांगितली. यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.  

रशियाने युक्रेवर केलेला हल्ला हा अन्यायकारक – जो बायडन

तसेच रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे मित्र देश त्यांच्या बाजुने एकजुटीने  उभे असून रशियाला प्रत्युत्तर देण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिले आहे. तर अमेरिकेने नाटो आणि इतर देशांसोबत यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापूर्वीच युक्रेनला लष्करी मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर रशियाने युक्रेवर हल्ला केला आहे. रशियाने युक्रेवर केलेला हल्ला हा अन्यायकारक असल्याचेही बायडन म्हणाले. जी-७ बैठकी रशियावर कोंडी करण्यासाठी अधिक निर्बंध लागू करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

रशियाने युक्रेवर हल्ला केल्यानंतर जभरात पडसाद

युक्रेवर रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलवरच्या किंमतीवर पोहोचल्या आहेत. तर सप्टेंबर २०१४ नंतर कच्चा तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरवर पोहोण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच भारतात शेअर मार्केवर देखील याचा परिणाम पडला आहे. भारतीय शेअर मार्केट १४०० अंकानी कोसळले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या ५ वर्षे अगोदरच झालं” पडळकरांची थोरातांवर शेलक्या शब्दांत टीका

News Desk

विमानतळावर नेणार आता ‘हेलिकॉप्टर टॅक्सी’

News Desk

जाणून घ्या… कधी होणार राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी

Aprna