साध्वी प्रज्ञा सिंहची तब्येत बिघडली, उद्या न्यायालयात हजर राहणार ?

साध्वी प्रज्ञा सिंहची तब्येत बिघडली, उद्या न्यायालयात हजर राहणार ?

भोपाळ | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काल (५ जून) रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात एका कार्यक्रमासाठी त्यांना आज (६जून) सकाळी सोडून देण्यात आले. प्रज्ञा या २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत आणि त्यांना मुंबईतील सन्यायालयाने नुकतेच ७ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले होते.

साध्वी यांना आतड्याला संक्रमण झाले असून कंबर दुखी आणि उच्च रक्तदाब वाढ झाले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यानुसार साध्वी एक किंवा दोन दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. साध्वी यांच्या सहकाऱ्याच्या म्हणण्यानुसार एका कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णालयातमध्ये आणले जाणार असल्याची माहिती त्यांची सहकारी उपमा यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञांची तब्येत ठीक नाही. उपचारासाठी त्यांनी आधीही रुग्णालयामध्ये भरती केले होते. साध्वीला पोटाशी संबंधीत आजार असून इजेक्शनमधून औषधे देण्यात आली आहेत.

आठवड्यातून एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने ३ जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तर साध्वीने आजारपण आणि संसदेतील कामकाज पूर्ण करण्याचे कारण देत खटल्यातील हजेरीपासून सूट देण्याची मागणी केली होती.

मालेगाव बॉम्बस्फोट

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास १०० जण जखमी झाले होते. मालेगावात एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणे आणि कट रचल्याच्या आरोपाखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.


Next Story
Share it
Top
To Top