काँग्रेसने आमचा प्रस्ताव नाकारला तर त्यांचं नुकसान होईल! - संजय राऊत

काँग्रेसने आमचा प्रस्ताव नाकारला तर त्यांचं नुकसान होईल! - संजय राऊत

नवी दिल्ली | देशातील ५ राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. तर या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात शिवसेना देखील ५० ते १०० जागा लढणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच शिवसेनेचे सदस्य यंदा उत्तर प्रदेश विधानसभेत असतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे. मथुरेतून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

शिवसेना गोव्यात ९ जागांवर आणि उत्तर प्रदेशात ५० ते १०० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं याआधी संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. तर आता याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, राऊत म्हणाले की, शिवसेनेने अयोध्येच्या मंदिरासाठी मोठा संघर्ष केला आहे. त्या विषयाला शिवसेनेने चालना दिली असून त्याचं श्रेय इतर कुणीही घेऊ नये, असे राऊत म्हणाले. तसेच अयोध्येत आणि मथुरेत आम्ही निवडणूक लढवणार आहोत, त्यासाठी ते दोन चार दिवसांनी मथुरेत जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच ज्या पद्धतीने शिवसेनेनं लढायचं ठरवलंय, त्याप्रमाणे उत्तर प्रदेश विधान सभेत शिवसेनेचे सदस्य असतील, याची मला खात्री आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.


राऊत पुढे म्हणाले की, गोव्यात ४० पैकी ३० जागा काँग्रेसला आणि १० शिवसेना, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीला एकत्रितपणे द्या, असा प्रस्ताव आम्ही काँग्रेससमोर ठेवला होता. गोव्यात काँग्रेसने कधीही न जिंकलेल्या जागा आम्ही मागितल्या आहेत. एकत्र लढलो नाही तर काँग्रेसची एक अंकी जागा सुद्धा येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, गोव्यातल्या स्थानिक नेत्यांना प्रचंड आत्मविश्वास आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.


Next Story
Share it
Top
To Top