ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार आणि एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. दुआ यांनी आज (४ डिसेंबर) वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दुआ यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, अवघ्या काही मिनिटांपूर्वी विनोद दुआ यांची कन्या मल्लिका दुआ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची दु : खद बातमी दिली आहे.

अपोलो रुग्णालयातपूर्वी दुआ यांना रविवारी (२८ नोव्हेंबर) रात्री परमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीच्या परमानंद रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु डॉक्टरांच्या सल्लानुसार दुआ यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच दुआ यांची प्रकृती गेल्या काही महिन्यापासून खालावलेली आहे. काहीच महिन्यांपूर्वी दुआ यांच्या पत्नी चिन्ना दुआ यांचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतर विनोद दुआ यांचीही प्रकृती सातत्याने खालावत गेली होती. दरम्यान, विनोद दुआ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते फुफ्फुसांशी संबंधित आजाराने ग्रस्त होते.


Next Story
Share it
Top
To Top