#ElectionCommission : जाणून घ्या... पाच राज्याच्या मतदानाचे संपूर्ण वेळापत्रक

#ElectionCommission : जाणून घ्या... पाच राज्याच्या मतदानाचे संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली | देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाचे सावट असताना देशातील पाच राज्यात निवडणुकीचा कार्यक्रम आज (८ जानेवारी) निवडूक आयोगाने जाहीर केला आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशाची निवडणूक सात टप्प्यात, पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. या पाच राज्यांच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.

दरम्यान, देशात पहिल्यांदाच उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरणार असून डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असे निवडणूक आयोगाने सांगितले. या पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. तसेच रोड शो, रॅली, प्रचार सभा साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. तसेच या राज्याच्या निवडणुकीचा प्रचार रात्री ८ वाजल्यानंतर प्रचारांवर बंदी घातली आहे.

या राज्यात २४.९ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार

देशातील पाच राज्यात ६९० जागांसाठी निवडणुका होणार आहे. या राज्यात २४.९ लाख मतदार पहिल्यांदाच त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे. तसेच पाच राज्यांच्या निवडणुकीत एकूण १८.३४ कोटी मतदा आहेत. तर त्यातील ८ कोटी ५५ लाख महिला मतदार आहेत. यूपीमध्ये २९ टक्के मतदार पहिल्यांदा मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

जाणून घ्या... पाच राज्यात या टप्प्यात?

उत्तर प्रदेश

  • पहिला टप्पा - १० फेब्रुवारी रोजी मतदान
  • दुसरा टप्पा - १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
  • तिसरा टप्पा - २० फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
  • चौथा टप्पा - २३ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
  • पाचवा टप्पा - २७ फेब्रुवारी २०२२
  • सहावा टप्पा - ३ मार्च २०२२ रोजी मतदान
  • सातवा टप्पा - सात मार्च २०२२ रोजी मतदान

पंजाब - १४ फेब्रुवारी २०२२

उत्तराखंड - १४ फेब्रुवारी २०२२

गोवा - १४ फेब्रुवारी २०२२

मणिपूर

  • पहिला टप्पा - २७ फेब्रुवारी २०२२
  • दुसरा टप्पा - तीन मार्च २०२२Next Story
Share it
Top
To Top