HW News Marathi
देश / विदेश

Russia-Ukraine Conflict: “सीमेवर वाढलेला तणाव चिंताजनक” भारताची UNSC बैठकीत पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी देशाला संबोधित करताना युक्रेनमधील दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली. पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स या दोन प्रांतांना वेगळे राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. पुतीन एवढ्यावर न थांबता त्यांनी रशियचे सैन्य दोन्ही प्रांतात पाठवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघांनी तातडीची बैठक बोलवली आहे. सध्या संयुक्त राष्ट्र संघात सुरू आहे.

 संयुक्त राष्ट्र संघामध्ये रशिया-युक्रेन प्रकरणावर भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले, “सध्या रशिया-युक्रेनमध्ये तात्काळ प्राथमिक डी-एस्केलेशन आहे. या ठिकाणांच्या सीमेवर वाढलेला तणाव चिंता जनक आहे. या परिस्थिती सर्वांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले असून रशिया-युक्रेन प्रश्न हा केवळ चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, अशी खात्री आहे.”

सध्या रशियन फेडरेशनसह युक्रेनच्या सीमेवर वाढलेला तणाव हा प्रश्न गंभीर आणि चिंताजनक आहे. त्याचबरोबर रशिया-युक्रेनमधील नगारिकांची सुरक्षा ही अत्यंत आवश्यक आहे. भारताचे २० हजारहून अधिक विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात राहत आहेत. यामुळे भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे तेथून बाहेर काढणे हे आमचे प्राधान्य आहे. रशिया-युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान आज (२२ फेब्रुवारी) युक्रेनला रवाना झाल्याची माहिती एएनआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

 पुतीन नेमके काय म्हणाले

पुतीने संबंधित करताना डॉनेत्स्क आणि लुगंस्क दोन राष्ट्र झाल्याची घोषणा केली. “युक्रेन हा रशियाच्या इतिहातातील अविभाज्य भाग असून पूर्व युक्रेन हा प्राचीन रशियन भूमी आहे. युक्रेनच्या दोन प्रांताना राष्ट्र करण्याच्या निर्णयाचे रशियामधील जनता स्वागत करेल. युक्रेन हे अमेरिकेच्या हातचे बाहुले असून रशियाला धोका निर्माण करण्यासाठी युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांचा उत्पादन करण्यास पाश्चिमात्य देश मदत करत आहेत. युक्रेनमधील जनतेने यापूर्वीच डॉनेत्स्क आणि लुहान्स स्वातंत्र्य राष्ट्र करण्याचा निर्णय घेणे गरजेचे होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून केरळ पुरग्रस्तांसाठी मदत मोहीम 

swarit

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

Aprna

मी राजकारणाचा बळी | नीरव मोदी

News Desk