देशात दरवर्षी २६ डिसेंबरला 'वीर बाल दिवस' साजरा होणार; पंतप्रधानांची घोषणा

देशात दरवर्षी २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा होणार; पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (९ जानेवारी) प्रकाश पर्वानिमित्त मोठी घोषणा केली आहे. देशात आता दरवर्षी २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वाच्या शुभ मुहूर्तावर, मला हे सांगताना अभिमान वाटतो की, या वर्षापासून २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. साहिबजादांच्या शौर्याला ही योग्य श्रद्धांजली आहे, असं मोदी म्हणाले.

शीख धर्माचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंह यांची आज जयंती असते. गुरू गोविंद सिंग यांची जयंती देशात प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. याच निमित्ताने पंतप्रधान मोदींनी आज घोषणा केली आहे. दरवर्षी १४ नोव्हेंबर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर आता २६ डिसेंबर या दिवशी 'वीर बाल दिवस' साजरा केला जाणार आहे. गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांच्या स्मृतीनिमित्त या दिवसाची घोषणा करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सांगितले की, "गुरु गोविंद सिंग यांची जयंती, प्रकाश पर्वा निमित्त, मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आता दरवर्षी २६ डिसेंबरला भारतात 'वीर बाल दिवस' साजरा केला जाईल. गोविंद सिंगांच्या चार साहिबजाद्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग शहीद झाले, त्याच दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जाईल. या दोन्ही महापुरुषांनी धर्माच्या महान तत्त्वांपासून विचलित होण्यापेक्षा मृत्यूला प्राधान्य दिले. त्यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सामंजस्यपूर्ण जगाची कल्पना केली. त्यामुळे सर्व लोकांना त्यांच्याविषयी माहिती मिळणे ही काळाची गरज आहे", अशी भावना मोदींनी ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.


https://twitter.com/narendramodi/status/1480064047894523905?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1480064047894523905|twgr^|twcon^s1_&ref_url=https://marathi.abplive.com/news/india/pm-narendra-modi-announces-26th-december-as-veer-baal-diwas-tribute-courage-of-sahibzades-quest-for-justice-१०२४३१८


अमित शहांकडून मोदींच्या निर्णयाचे स्वागत

दरम्यान, मोदींच्या या वीर बाल दिवस साजरा करण्याच्या निर्णयाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील स्वागत केले आहे. अमित शहा म्हणाले, 'वीर बाल दिवस' साजरा करण्याच्या निर्णयामुळे आज करोडो मुले चार साहिबजादांच्या देशभक्तीतून प्रेरणा घेऊ शकतील. तसेच मोदींच्या या निर्णयामुळे आता पुढच्या पिढ्यांना देखील त्यांचं हे योगदान लक्षात राहील. यासाठी मी मोदीजींचे आभार मानतो, असे ते म्हणाले.


Next Story
Share it
Top
To Top