देशातील पाच राज्यांत पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच गोव्यातही भाजपाच्या विरोधात वातावरण असल्याचे त्यांनी सांगितलं असून उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या दाव्याचं समर्थन केलं होतं. त्यावर भाजपकडून पवार आणि राऊतांवर टीका करण्यात आली आहे.
#SharadPawar #SanjayRaut #BJPShivSena #UddhavThackeray #BJP #NCP #ViralPhoto #ChandrakantPatil #AtulBhatkhalkar #MaharashtraPolitics #Elections #Trending