धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपाने आपल्या किती मंत्र्यांचे राजीनामे घेतले ?

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपाने आपल्या किती मंत्र्यांचे राजीनामे घेतले ?

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सामाजिक न्यायासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या मंत्र्यावर असे आरोप झाल्यामुळे ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. तर दुसरीकडे पक्षप्रमुख म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे. या सर्व घड़ामोडी घडत असताना मागच्या फडणवीस सरकारमधील मंत्र्यावर कोणत्या स्वरुपाचे आरोप झाले होते?, त्या आरोपांचं स्वरुप काय होतं?, आरोप झालेल्या नेत्यांना नंतर कोणती राजकीय किंमत मोजावी लागली?, या सर्व गोष्टींचा आजच्या विशेष स्टोरीमध्ये घेतलेला हा धांडोळा. फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे, तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे किंवा तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले. #DhananjayMunde #PankajaMunde #EknathKhadse #VinodTawde #DevendraFadnavis #BJP #NCP #SharadPawar


Next Story
Share it
Top
To Top